सातारा प्रतिनिधी । “गेल्या अनेक वर्षात भाजपचे काम सातारा जिल्ह्यात प्रचंड वाढलं आहे. आज सातारा जिल्ह्यातील भाजप हा नंबर एकचा पक्ष आहे. जसे लोकसभेला छत्रपती उदयनराजे भोसले यांना याठिकाणी विजय मिळाला. तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही आपली महायुती या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकेल आणि एक चांगला रेकॉर्ड आपण या जिल्ह्यात तयार करू,” असा विश्वास भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, धैर्यशील कदम, आनंदराव पाटील, मनोज घोरपडे, विक्रम पावस्कर, कोअर कमिटीच्या सदस्या प्रिया शिंदे, भरत पाटील, मकरंद देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वराज्याच्या राजधानीमध्ये सातारा जिल्ह्याच्या भाजप कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे. आपल्यासाठी एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे कि आपल्या भाजपला स्वराज्याच्या राजधानीत साताऱ्यात स्वतःच घर मिळतंय. पक्षाचं जिल्हा कार्यालय या ठिकाणी तयार होती. देशभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशस्त अशा प्रकारचे जिल्हा कार्यालय असले पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न गेली काह वर्षे आपण सुरु केला. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये त्याकरिता जागा घेतल्या. अनेक जिल्ह्यात बांधकाम सुरु झालं. काही जिल्ह्यातील बांधकाम पूर्ण झालं आहे.
मला आनंद आहे कि साताऱ्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आपण आज केलं असून अतिशय चांगल्या प्रकारे तयार केलेला आराखडा मला दाखवण्यात आला. मला विश्वास आहे भाजपचे कार्यालय किती मोठं आहे यापेक्षा ते जनतेला किती न्याय देतंय. जनतेकरिता हक्काचं स्थान म्हणून ते कशा प्रकारे आपण स्थापित करू शकतो हे अधिक महत्वाचं आहे. त्याचसोबत आपला पक्ष इतका मोठा झाला आहे तो वाढत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एक हक्काची जागा हवी याकरिता कार्यालय असणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले.