काल शेतात फेरफटका आज नातवासोबत चालवला ट्रॅक्टर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतकामात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रविवारपासून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. काल शेतात फेरफटका मारल्यानंतर शिंदे यांनी आज त्यांच्या नातवासोबत पुन्हा शेताची पाहणी केली आणि नातवालासोबत घेऊन ट्रॅक्टरही चालवला. यावेळी स्ट्रॉबेरीच्या शेतात गेल्यानंतर त्यांनी लावलेली स्ट्रॉबेरी देखील घेतली.

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात जाऊन बांबू, चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. मागील काही वर्षांमध्ये आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून एकनाथ शिंदे यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. दरम्यान, आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवासह शेत-शिवारात फेरफटका मारल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये त्यांनी आपलया नातवाला घेऊन शेती आणि मातीची पाहणी केली.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारात महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली, त्यात 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच मतदारसंघात गेले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज शिंदे यांनी आपल्या नातवांसोबत शेत शिवारात काम केले आणि शेतात लावलेली स्ट्रॉबेरी देखील घेतली.

WhatsApp Image 2024 12 24 at 6.58.34 PM

महाबळेश्वर, पाचगणीतील समस्यांचा अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्रांती घेण्यासाठी सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळगावी गेले आहेत. आज सकाळी त्यांनी आपल्या दरे येथील निवासस्थानी महाबळेश्वर आणि पाचगणी नगर परिषदांचे मुख्याधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी या दोन्ही नगरपरिषदांची आढावा बैठक घेत नगरपरिषदांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा केली. यावेळी नगरविकास विभागाच्या माध्यमातून लागणार निधी देण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी दिल्या. यावेळी महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि महाबळेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी.पी. सांडभोर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.