सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून वाई तालुक्यातील एकावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. विजय लक्ष्मण अंकोशी (रा धोम कॉलनी ता. वाई जि सातारा) असे तडीपार करण्यात आल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणुन वाई पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने वाई पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगार विजय लक्ष्मण अंकोशी (रा धोम कॉलनी ता. वाई जि सातारा) याचेविरुध्द वाई पोलीस ठाणे खुनाचा प्रयत्न ०२ गुन्हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे धमकावणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याचा हद्दपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांस सादर करण्यात आला होता.
उपविभागीय दंडाधिकारी वाई यांनी त्यांस प्राप्त अधिकारान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ५६(१) (अ) (ब) प्रमाणे सदर सराईत आरोपी नामे विजय लक्ष्मण अंकोशी यांस सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधुन पुढील ०६ महिने कालावधीकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. अपर पोलीस अधिक्षक साो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्री.बाळासाहेब भालचिम मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र शहाणे, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पो.कॉ १३०२ नितीन कदम यांनी केली आहे.