सातारा प्रतिनिधी | हिट अँड रन कायद्या प्रकरणी वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. सर्व ड्रायव्हर यांच्या विरुद्ध केलेला ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा, अशी महत्वाची मागणी खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेने वडूज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिनकर खुडे, स्वप्नील ताटे, आबासाहेब भोसले, निखिल इंदापुरे, जयवंत खराडे, प्रशांत इंदापुरे, गणेश सकट, सोमनाथ फडतरे, अजित अवघडे, राजेश कुंभार, बाबासाहेब तुपे, अंकुश धावड, रवी गोडसे, किरण जाधव, आधिसह चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की, शासनाने आमलात आणलेला ‘हिट अँड रन’ रद्द करावा जो शासनाने ७ लाख दंड व १० वर्षे कारावास शासनाने रद्द करावा जर चालकाकडे ७ लाख रुपये असते तर तो ड्रायवर झाला असता का? चालक हा देशाचा दळण-वळणाचा मुख्य कणा असताना त्याच्यावर एवढा मोठा अन्याय का असा अन्याय आम्ही सहन करणार नाही यासाठी आम्ही
सर्व चालक-मालक सर्व वाहतूक बंद ठेवणार आहे.
जर हा कायदा रद्द झाला नाही तर येणाऱ्या पुढील काळात आम्ही सर्व चालक-मालक सर्व महाराष्ट्रभर वाहतूक बंद पुकारणार आहे. जर सर्व सामन्यास जनतेस कोणताही त्रास झाल्यास होणाऱ्या परिणामास सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल. ट्रान्सपोर्ट युनियनने जो बंद पुकारला आहे त्याला खटाव तालुका चालक मालक संघटनेने एक दिवस बंद ठेऊन पाठिंबा दर्शवला आहे. ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करावा अन्यथा खटाव तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी वाहतूक बेमुदत बंद ठेवण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.