सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन दीपक प्रल्हाद चव्हाण हे विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज आज शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी दाखल करणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुरस्कृत राजे गटाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी ठीक १ वाजता फलटण येथील श्रीराम मंदिर येथून शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून म्हणजेच सन २००९ पासून दीपक चव्हाण हे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात दीपक चव्हाण हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत.
आज फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा दीपक चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून राजे गटाच्या वतीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.