दहिवडी-नातेपुते मार्गावर अज्ञात वाहनाची बसली तरसाला धडक, पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | दरवर्षी अज्ञात वाहनांच्या धडकेत अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. अशीच एक घटना माण तालुक्यातील दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे घडली. या ठिकाणी तरस हा वन्य प्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे.

दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे असणाऱ्या मोठ्या पुलाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तरस मृतावस्थेत आढळून आला. तरसाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रात्री रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा तरस हा गंभीर जखमी होऊन रस्त्यालगत जावून पडला असावा, अशी चर्चा लोकांमध्ये केली जात आहे. या घटनेनंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मृतावस्थेत असलेल्या तरसाचा पंचनामा केला. तरस हा निरुपद्रवी प्राणी असून तो मेलेली जनावरे त्यांचे हाडांचे अवशेष इत्यादींवर जगणारा प्राणी आहे.