सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील आंधळी येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. या दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ” अरे मी काही ऐकलंच नाही, मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, तर काय बोलणार,” असं फडणवीस यांनी म्हंटले.
माण तालुक्यातील आंधळी येथील जल पूजन कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेदर फडवीस हे पुढील कार्यक्रमासाठी निघाले होते. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाविषयी विचारणा केली. त्यावेळी सुरुवातील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. त्यानंतर दोनच वाक्य बोलत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आंतरवली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निर्णायक बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी घ्यायचा आहे. ठीक आहे, मी आजच सागर बंगल्यावर येतो, घाला मला गोळ्या,” असे म्हणत जरांगे बोलता-बोलता जागेवरून उठले आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले.