सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचा जल पूजन सोहळा आज आंधळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोहळ्यात जलपूजन करण्यात येणार असून आज साताऱ्यात त्यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “चिन्हाच्या अनावरणासाठी खा. शरद पवार यांना ४० वर्षानंतर रायगडावर जावं लागलं याचा खरं क्रेडिट अजितदादांनाच द्यावं लागेल. सध्या शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थोरल्या पवारांवर टीका केली.
साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार आहोत. भाजपमध्ये अगोदर वरिष्ठांकडून जागा वाटपाचा निर्णय घेतला जातो त्यानंतर घोषणा केल्या जातात. कुठल्या जागा लढायच्या हे एकदा ठरलं कि आम्ही ते जाहीर करू. उदयनराजे भोसले यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांची व माझी खूप जुनी मैत्री आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे शरद पवार यांच्यावर टीका pic.twitter.com/ePHmDffJ31
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 25, 2024
EVM मशीन हाक करून दाखवा असे निवडणूक आयोगाने ओपनचॅलेंज दिले होते. वास्तविक निवडणूक जिंकली कि मशीन चांगले आहे आणि निवडणूक हरळी कि मशीनला दोष द्यायचा असे करणे योग्य नसल्याच देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले.
उदयनराजेंच्या उमेदवारीवर उपमुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
भाजपकडून लोकसभा उमेदवारी देण्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं, ”आम्ही आता बसून कुणी कोणत्या जागा लढणार यासंदर्भात निर्णय करु. आमची चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. या फेरीत बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहे. आणखी दोन तीन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, ज्यामध्ये सर्व प्रश्न सुटतील. एकदा कोणत्या जागा लढायच्या यावर ठरलं की मी तुम्हाला सांगेन. माझ्यासारख्या नेत्याने बोलणं योग्य नाही. योग्य वेळी सर्व गोष्टी समोर येतील.” असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले.
बच्चू कडू आमच्यासोबत नाहीत : देवेंद्र फडणवीस
साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रहार’च्या बच्चू कडू यांच्याबाबत देखील आपले मत व्यक्त केले. बच्चू कडू हे आमच्यासोबत महायुतीत आलेच नाहीत. ते शिवसेनेसोबत असल्याचे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले.