लोणंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तडीपार इसमास घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेल्या इसमास डीबी पथकाने नुकतीच अटक केली. शेखर शरद खताळ (वय ३२, रा. कापडगाव ता. फलटण जि. सातारा) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१८/०६/२०२४ रोजी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले यांचे आदेशान्वये डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे व पोलीस कॉन्स्टेबल केतन लाळगे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी फलटण तालुक्यातील खराडेवाडी गावच्या हद्दीत सह्याद्री ढाब्याचे समोर लोणंद फलटण रोडवर हद्दपारिचा आदेश असताना देखील शेखर शरद खताळ हा वारंवारता असलेला आढळून आला.

त्यास तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेत त्याचे विरुध्द लोणंद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा योगेश कुंभार हे करीत आहेत. तसेच सदर आरोपी हा शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २०३/२०२४ भा.द.वि. कलम ३२५,३४१,५०४,५०६,३४ सह आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे दिनांक १४/०६/२०२४ रोजी दाखल असुन सदर गुन्हयात पाहीजे असलेला आरोपी आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, तसेच पोहवा विजय पिसाळ, नितीन भोसले, मपोकॉ अश्विनी माने, ऋतुजा शिंदे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.