कराड प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात सध्या परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेस सर्वसामान्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उत्तरेत परिवर्तन निश्चित घडणार, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.
कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे महायुतीतून मंजूर झालेल्या विविध विकासकांचे गुरुवारी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजप नेते मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, नागझरी येथील भाजप पदाधिकारी गणेश भोसले यांच्यासह स्थानिक भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नागझरी येथे भाजप पदाधिकारी, ग्रामस्थांच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम , मनोज घोरपडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गावातील मंजूर रस्ता काँक्रीटीकरण कामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी यांचेसह स्थानिक भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.