कडक उन्हामुळे वाढला उष्माघाताचा धोका!; नेमकी काय काळजी घ्याल?

0
324
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या कडक उन्ह पडत असल्याने या उन्हाचे अनेक परिणाम हे अनेक घटकावर होत आहेत. खासकरून मानवी शरीरावर जास्त परिणाम होतो. उन्हाळा म्हटला की, बऱ्याच जणांना डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम उद्भवू शकतात. या काळात शरीराला पुरेसे पाणी मिळणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीराला मुबलक पाण्याची गरज असते.

उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार व मिनरल्स शरीराबाहेर फेकले जातात; ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी-जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणी पिणे आवश्यक असते. जसजसे तापमान वाढत जाते, तसतसे तुमचे शरीर थंड होण्यासाठी ओव्हरड्राइव्हमध्ये जाते. हे वाढत्या घामामुळे होते, जेव्हा द्रवपदार्थाचे सेवन कमी होते तेव्हा घाम कमी येतो, डिहायड्रेशन होते. काही लोकांना लघवी नीट होत नाही आणि त्यांना जळजळ देखील होऊ शकते. पाण्याअभावीही अचानक चक्करही येऊ शकते. अशक्तपणामुळे असा त्रास होऊ शकतो.

डिहायड्रेशनची लक्षणे काय?

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी पिवळी होते. हे सगळ्यात सुरुवातीचे लक्षण आहे. जर लघवी पिवळसर होत असेल आणि कमी येत असेल तर हे स्पष्टपणे सूचित करते.

तापमान ३९ अंशांवर…

वळीवाच्या पावसामुळे ४१२ वर असणारे तापमान ३९ वर आले आहे. काही दिवसापूर्वी तापमान ४० अंशांच्या वर होते. त्यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागला. सध्या हवेत गारवा असल्यामुळे साहजिकच तापमानही कमी आहे. परंतु दुपारच्या सुमारास तापमानात वाढ होत असल्याचे जाणवत आहे.

काय काळजी घ्याल?

  • उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी आणि थंड राहण्यासाठी नियमितपणे पाणी प्या.
  • दररोज सहा ते आठ ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा.
  • पाण्यात मीठ आणि साखर मिसळून साधे पाणी प्या. तहान लागेपर्यंत थाबू नका

यांना सर्वाधिक धोका..

मुले, वृद्ध आणि उन्हात काम करणारे किवा उष्ण, दमट वातावरणात राहणारे लोक विशेषतः डिहायड्रेशनला बळी पडतात. सुरक्षित राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे तहान लागण्यापूर्वीच हायड्रेशनला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत महत्वाचे निर्देश…

राज्यातील विविध जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो. उष्णतेच्या लाटामुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता, जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग, नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाय योजना व मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. या सूचनांची विविध विभागांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.