सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे एकूण ७ लाख २० हजार रुपये किंमतीचे एकूण २४ मोबाईल गहाळ आणि चोरीला गेले होते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी संबंधित मोबाईल शोधून काढत ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे एकूण ७ लाख २० हजार रुपये किंमतीचे एकूण २४ मोबाईल गहाळ आणि चोरीला गेले होते. पोलिसांनी सीईआयआरपोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे हरविलेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करुन ते हस्तगत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे हस्ते मुळ तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले. सदरची मोहिम पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. बापूसाहेब सांडभोर यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, हवालदार बापु खांडेकर, पोलीस नाईक नितीन धुमाळ, कॉ. निलेश कुदळे, असिफ नदाफ, महेंद्र खाडे. सायबर पोलीस ठाणेचे कॉ. महेश पवार यांनी केली.