कराड प्रतिनिधी । कराड व मलकापूर येथील मोकाट कुत्र्यांनी गेल्या महिन्यात अनेक नागरिक, महिला व मुलांवर हल्ले केले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांनीही हल्ले केले आहेत. त्यामुळे रेबिज रोगाचा धोका असून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि, १२ रोजी कराड तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक दादा शिंगण यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
मलकापुरात पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. यावेळी कुत्र्याच्या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले. या घटनेनंतर शिंगण कराड येथील तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी माहिती माही दिली यावेळी शिंगण म्हणाले की, नुकतेच कराड व मलकापुरात – पिसाळलेला कुत्र्याने अनेक नागरिक व महिलांवर हल्ला केला. ज्या इतर कुत्र्यांवरही हल्ला केलेला आहे.
या कुत्र्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे अन्यथा अन्य कुत्रीही पिसळून आणखी नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करावे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिसाळलेला कुत्रा चावल्यास रेबिजचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा आजार जीवघेणा आहे. त्यामुळे तातडीने कुत्रा चावलेल्यांना तातडीने रेबिजचे लसीकरण आवश्यक आहे. कराड व मलकापूर नगरपालिकेने कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शिंगण यांनी म्हटले.
अचानक हल्ल्यामुळे उडाली होती धांदल
मलकापूर हद्दीतील लाहोटी नगर परिसरात दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी पिसाळलेलया कुत्र्याने अचानक नागरिकांवर झडप घालत हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी त्याने काही महिलांच्या नाकावर हल्ला करत त्याचे लचके काढले. तर काही पुरुषांच्या हातावर चावा घेतला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावाधाव झाली होती.
कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही दुर्लक्ष : दादा शिंगण
कराड आणि मलकापूर नगरपालिका प्रशासनाने एकत्रित मिळून पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करावा. जेणे करून १ तारखेला जी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याची घटना घडली. ती भविष्यकाळात घडू नये. कराड व मलकापूर पालिकेने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने आता थेट आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेचे नेते दादा शिंगण यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.