सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या वाघ नखांच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर प्रदर्शन कालपासून खुले करण्यात आले असून काळ शनिवार आणि आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सातारकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिली. इतर शिवकालीन वस्तू पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिक स्त्री-पुरुषांकडून मोठया संख्येने गर्दी केली जात आहे.
छत्रपती शिवाजी म्युझियमचे वाघनखे व प्रदर्शन पाहण्यासाठी शनिवारी दोन शाळांचे विद्यार्थी समूहाने आले होते. त्याचबरोबर स्त्री-पुरुष साधारणपणे पंधराशेच्या संख्येने आले होते. साधारणपणे तीन ते चार हजार जणांनी प्रदर्शन पाहिले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफतच प्रदर्शन ठेवण्यात आले असून १६ ते १७ हजार रुपये प्रदर्शन बघणारांकडून वस्तू संग्रहालयाला मिळाले अशी माहिती सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक ( क्युरेटर) प्रवीण शिंदे यांनी दिली.
ऐतिहासिक शाहूनगरीत पावसाचे प्रमाण जास्त असले तरी स्त्री पुरुष पावसापासून संरक्षण म्हणून छत्र्या घेऊनही प्रदर्शन व वाघनखे पाहण्यासाठी आले होते. जुन्या जागेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे नवीन जागेत आल्याने व त्याचे उद्घाटन झाल्याने अनेकांनी वस्तुसंग्रहालयाची नवीन इमारत व प्रदर्शन पाहणे साठी गर्दी केली होती.