सातारा प्रतिनिधी | लोणंद पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक धायगुडे (रा. रा.सुखेड, ता. खंडाळा) याला सातारा, सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर विनयभंग, मारामारी, शिवीगाळ, दमदाटीचे गुन्हे नोंद आहेत.
लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले दीपक धायगुडे याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. फलटणच्या डीवायएसपींनी प्रस्तावाची चौकशी केली होती. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्याच्यात बदल होत नव्हता. त्याच्यावर कडक कारवाईची मागणी नागरिकांतून होत होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरूद्ध कडक कारवाईची भूमिका घेतली.
या बाबी लक्षात घेऊन गुंड दीपक धायगुडे याला सातारा, सोलापुर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर व बारामती तालुक्यातुन सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मा. पारित करण्यात आला. हद्दपार प्राधिकरणापुढे लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार संतोष नाळे, सर्जेराव सूळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, नितीन भोसले, अभिजीत घनवट यांनी पुरावा सादर केला.