बोरगावातील सराईत गुन्हेगार 1 वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असणाऱ्या एक गुन्हेगाराविरोधात एक वर्षाकरीता हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गणेश गुलाब कारंडे (रा. अतित ता. जि. सातारा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर सातारा जिल्हयामध्ये जबरी चोरी, जुगार, दंगा मारामारी, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांनी सदर सराईत गुन्हेगाराविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सो. सातारा यांचे मार्फतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी केली होती.

यातील साराईत गुन्हेगाराकडून सातारा जिल्हयातील सर्वसामान्य लोकांचे शरिराविदचे तसेच मालमत्तेचे नुकसान करुन गुन्हे करीत होती. त्याचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यास अटक व कायदेशिर कारवाई करुनही तो जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्याचेवर झाला नाही. तसेच त्याचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही. तसेच त्याचेवर कायदयाचा कोणताच पाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

वरील सराईत गुन्हेगारास उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा सुधाकर भोसले यांच्या समोर सुनावणी करीता हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये सातारा जिल्हयातून एका वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला. या कामी हदपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सहा. पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे, पो.हवा अमित सपकाळ स्थानिक गुन्हे शाखा सातारा, किरण निकम, दादा स्वामी, प्रशांत चव्हाण बोरगाव पोलीस ठाणे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

12 उपद्रवी टोळयांमधील 35 जण तडीपार

नोव्हेंबर २०२२ पासुन १२ उपद्रवी टोळयांमधील ३५ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील ८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.