सणबूरच्या निवृत्त शिक्षकाच्या कुटूंबाच्या मृत्युनंतर पोलिसांचा हाती लागली ‘ती’ महत्वाची वस्तू; लवकरच…

Sanbur Crime News 1

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील सणबूर येथील एका घरात निवृत्त माध्यमिक शिक्षकासह पत्नी, मुलगा आणि मुलगी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे कराड – पाटण तालुका हादरून गेला होता. चौघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय असावे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असताना त्यांच्या हाती घडलेल्या घटनास्थळी महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मृतदेहाच्या … Read more

कराड- शेडगेवाडी मार्गावर दुचाकी-सिलेंडरच्या ट्रकची भीषण धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

jpg 20230723 005426 0000

कराड प्रतिनिधी | कराड – शेडगेवाडी या मार्गावर येळगाव फाटा येथे दुचाकी व सिलेंडरच्या ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाल्याच्या घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात पाचगणी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. सुनिल श्रीमंत पाटील (वय 42, रा. पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली) असे ट्रक व दुचाकीच्या धडकेतील अपघातात ठार झालेल्याचे नांव आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Satara Local Crime Branch News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात खुनाचे केलेले प्रयत्न व चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. या पथकाकडून दोन आरोपींचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आली आहे. अकिब जावेद कासमसाहेब नंदगळकर (रा. निसर्ग कॉलनी, बुधवार नाका सातारा) व प्रितम अशोक पवार, (वय ३६, रा.प्लॉट नं.७, सिंधु … Read more

सकाळी सकाळी ‘तो’ ST बस तशीच सुरु ठेवून गेला चहा प्यायला; अन् पुढं घडलं असं काही…

Karnataka State Bus News

सातारा प्रतिनिधी । पावसाळ्यात चारचाकी वाहनांच्या अपघाताच्या घटना नेहमी घडतात. अशा घटनांमागे काहींना काही कारण हे नक्कीच असते. अशीच अंगावर थरकाप उडवणारी घटना सातारा शहरातील राजवाडा बस स्थानकावर घडली आहे. या ठिकाणी कर्नाटक राज्यातील बस चालक बसस्थानकाच्या उताऱ्यावर बस उभी करून चहा पिण्यासाठी गेला असता बस उताऱ्यास लागल्याने थेट स्थानकासमाेर रिक्षावर जाऊन आदळल्याची घटना आज … Read more

कराड हद्दीत गोवा बनावटीचा 20 लाखांचा मद्यसाठा पकडला; दोघांना अटक

Goa made liquor seized in Karad

कराड प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी अमली पदार्थ तसेच बनावटीचा मद्यसाठा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान कराड येथील उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कराड हद्दीत गोवा बनावटीचा तब्बल 20 लाखांचा मद्यसाठा पकडला असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे विभागीय उप-आयुक्त … Read more

सडावाघापूरचा उलटा धबधबा पहायला गेलेल्या पतीला पत्नीसमोर ‘त्यांनी’ केलं उलथं-पालथं

Waterfall Of Sadavaghapur News

पाटण प्रतिनिधी । सध्या पावसाळा चांगली सुरुवात झाली असल्याने पाटण तालुक्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देत आहेत. मात्र, या याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय एका पतिपत्नीला आला आहे. येथील सडावाघापूरचा उलटा धबधबा पहायला गेलेल्या एका … Read more

2 लाखांची 4 गावठी बनावटीची पिस्तूली जप्त; कराडच्या दोघांना अटक

Karad police News

कराड प्रतिनिधी | शिरपूर पोलिसांनी गुरूवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये कराड तालुक्यातील दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४ गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह, १० हजार रुपये किमतीचे २ अतिरिक्त मॅगझिन, ७ हजार रुपये किमतीची ७ जिवंत काडतूसे असे एकूण १ लाख ९७ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. … Read more

एकीव धबधब्यावरील खूनाचा गुन्हा पोलिसांकडून 72 तासांत उघड; 3 जणांना अटक

Murder Case at Ekiv Falls

कराड प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील 700 फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आता तब्बल 72 तासानंतर खुनातील 3 आरोपींचा शोध घेत मेढा पोलिसांनी … Read more

चिमुरडीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा

Case Of Rape Little Girl News (1)

कराड प्रतिनिधी । अल्पवयीन 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यात रूवले (ता . पाटण) येथील आरोपीला कराडचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. एस. व्होरे यांनी आज फाशीची शिक्षा ठोठावली आहे. २०२१ साली ढेबेवाडी खोऱ्यातील रूवले गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. कराड न्यायालयाच्या इतिहासात फाशीची शिक्षा … Read more

पाटण तालुका हादरला ! एकाच कुटूंबातील 4 जणांचे घरात आढळले मृतदेह

Sanbur Crime News

कराड प्रतिनिधी । पावसामुळे ग्रामीण भागातील दुर्गम क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना पाटण तालुक्यातील सणबूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह घरामध्ये शुक्रवारी सकाळी आढळून आलेले आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या कुटूंबियांमध्ये आई, वडील, अविवाहित मुलगा आणि विवाहित मुलगी अशा सदस्यांचा … Read more

Crime News : एकीव धबधब्यातील घटनेप्रकरणी 5 संशयित ताब्यात

WaterFolls News

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून करण्यात आला होता. हा प्रकार प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर पोलिसांनी मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला केला. होता. दरम्यान या घटनेतील संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला … Read more

जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यानं महिलेसोबत केलं ‘हे’ कृत्य

Karad City Police

कराड प्रतिनिधी : कराड शहरात जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याला पुरुषांप्रमाणे आता महिलाही बळी पडू लागल्या आहेत. असाच प्रकार कराड शहरात घडला असून एका तरुणाने महिलेला पैशांची गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देतो असे सांगत फसवणूक केली आहे. याबाबत तबस्सूम हमीद शेख (रा. मलकापूर) यांनी कराड शहर पोलीस … Read more