प्रवाशांनी भरलेल्या ST बसचा ब्रेक झाला फेल; भीषण अपघातात 1 महिलेचा मृत्यू

ST Bus News 3

सातारा प्रतिनिधी | पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर बस पाठीमागे येत असताना चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण बस पाठीमागे सरकल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवर बस गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. प्रीती योगेश बोधे (४०) असे मृत झालेल्या … Read more

पाण्यात पडलेलं रेडकू वाचविण्यासाठी गेला अन् बाहेर आलाच नाही; 20 वर्षाच्या तरुणावर काळाचा घाला

20 Year old Youth News

कराड प्रतिनिधी । दुपारच्यावेळी माळ रानात रेडकू चरण्यासाठी घेऊन गेलेल्या 20 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली. कॅनॉलच्या पाण्यात पडलेले रेडकू वाचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. संबंधित बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी आढळून आला. प्रशांत लक्ष्मण दळवी (वय 20, रा. आर्वी, ता. … Read more

Satara Crime : चोरट्यांचा धुमाकूळ!! एकाच रात्रीत २४ घरफोड्या; लाखोंचा ऐवज लुटला

Burglary in wai

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्री पसरणी, कुसगांव, ओझर्डे,सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत तब्बल २४ बंद घरे फोडून सोने व रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम शनिवारी सायंकाळ पर्यत सुरु होते. एकाच रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणाऱ्या या चोरट्यांना … Read more

यवतेश्वरला 2 कारची भीषण धडक : सातारा पालिकेतील कर्मचारी तरुणी जागीच ठार; 1 गंभीर

jpg 20230729 215953 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात सातारा पालिकेतील कर्मचारी २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. गायत्री दीपक आहेरराव (वय २१, रा. शनिवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर ओंकार लोखंडे … Read more

घरफोडीतील दागिने विकायला गेला अन् फसला; 36 हजाराच्या दागिण्यांसह पोलिसांनी केली अटक

Crime News Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सध्या शहरात घरफोडी, चोरी तसेच लुटमारीच्या घटनांमधील फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आज शहरातील दोन घरफोडीच्या घटनांमधील फरार आरोपीला दागिने विक्रीसाठी घेऊन जाताना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. निलेश शरद तावरे (रा. घुले कॉलनी शाहुनगर सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

घरच्यांना भेटण्यासाठी आला अन् सापळ्यात अडकला; दरोडा टोळीतील फरार आरोपीस अटक

Satara Local Crime Branch News

सातारा प्रतिनिधी। कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून रक्कम लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेतील फरारी आरोपीचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान आज फरारी आरोपी घरच्यांना भेटण्यासाठी आला असताना पोलिसांना त्याला पकडण्यास यश आले आहे. अदित्य बनसोडे (रा. वनवासवाडी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

महाबळेश्वर – सातारा मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

Crack Collapsed Kelghar Ghat News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर- केळघर परिसरात मान्सूनने जोर धरला असून सरीवर सरी बरसत आहेत. जावळी तालुक्यातील मेढा हद्दीत येत असलेल्या महाबळेश्वर – सातारा मार्गावर केळघर घाटात दरड कोसळण्याची घटना आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत दरड काढण्याचे काम सुरु करण्यात … Read more

मेंढपाळ बनून ‘तो’ 21 वर्षापासून देत होता गुंगारा; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 8

कराड प्रतिनिधी । तब्बल 21 वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावात महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती. संबंधित महिलेचा खून हा खटाव तालुक्यातील भूषणगड येथील एक युवकाने केला असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून संबंधित आरोपी हा फरार होता. त्या आरोपीस तब्बल 21 वर्षानंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. किसन … Read more

सातारा जिल्ह्यातील BJP च्या ‘या’ नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

BJP Satara News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय व्सर्तृकात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी एका खासगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. … Read more

50 हजारांची मागितली लाच; ACB कडून मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ACB News

कराड प्रतिनिधी । तक्रारदाराने जमिनीतून स्वखर्चाने गाळ, मुरूम, माती काढून वाहतूक करण्याकरिता भाड्याने वापरलेली वाहने जप्त करू नयेत म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या पिंपोडे बु. ता. कोरेगाव येथील मांडलाधिकाऱ्यावर आज लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला. संबंधिताने सुरुवातीला 50 हजारांची लाचेची मागणी केली होती. नंतर 40 हजार रूपयांवर तडजोड केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराडात पोलिसांचे संचलन

Karad City Police Movement News

कराड प्रतिनिधी । मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील अंतर्गत मार्गावरून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाने संचलन केले. यावेळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 पोलीस निरीक्षक, बारा पोलीस अधिकारी, 38 पोलीस अंमलदार वाहतूक, 1 आरसीपी पथक, 24 होमगार्ड यांचा संचलनात सहभाग घेतला होता. बुधवारी सायंकाळी सहा … Read more

Mumbai High Court चा सातारा न्यायालयातील 2 न्यायमूर्तींना दणका ! दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Satara Court News

सातारा प्रतिनिधी । मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आज एक महत्वपूर्ण आदेश देण्यात आला. यामध्ये सातारा न्यायालयातील दोन न्यायमूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिलेल्या आदेशानुसार एका न्यायमूर्तींना पदावनतीला सामोरे जावे लागले असून दुसऱ्या न्यायमूर्तींना तात्काळ बदली आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी सातारा बार असोसिएशनने प्रमुख सत्र व जिल्हा … Read more