जंगली हिंस्र प्राण्यांची 30 लाखांची नखे जप्त; सांगलीच्या एकास अटक, अन्य एकजण फरार

Crime News 20241112 075129 0000

कराड प्रतिनिधी | जंगली हिंस्र प्राण्याच्या नख्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले असून त्याचा साथीदार पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. शहरातील शनिवार पेठेत सागर लॉजनजीक असलेल्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवर रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने … Read more

कराड शहर पोलिसांची दमदार कारवाई, ओगलेवाडी घरफोडीच्या गुन्ह्यातील 58 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 20241111 211518 0000

कराड प्रतिनिधी | ओगलेवाडी (ता. कराड) येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दागिने आणि रोख रक्कम मिळून 58 लाखांचा मुद्देमाल कराड शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. ओगलेवाडी ता. कराड येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचा गज कापून दोरीच्या साह्याने घरात प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा … Read more

वाई पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारास सातारा जिल्ह्यातून हद्दपार

Wai News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून वाई तालुक्यातील एकावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. विजय लक्ष्मण अंकोशी (रा धोम कॉलनी ता. वाई जि सातारा) असे तडीपार करण्यात आल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख यांनी कायदा सुव्यवस्था … Read more

पत्नीवर कोयत्याने हल्ला करण्यास आलेल्या हल्लेखोर पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20241111 090835 0000

सातारा प्रतिनिधी | पती संशयित नजरेने पाहून सतत वादावादी करत असल्याने आठ महिन्यांपासून माहेरी रहात असलेल्या पत्नीचा खून करण्यासाठी आलेल्या पतीला भुईंज पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. स्वप्निल वालचंद सोनावणे (रा. नायगाव ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे … Read more

मद्यपी क्रेन चालकाची दुचाकीस भीषण धडक; कराडच्या 2 महिला ठार तर एक गंभीर जखमी

Crime News 20241111 080952 0000

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी तालुका कराड गावच्या हद्दीत स्कूटी दूचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चालकाने दारुच्या नशेत भीषण धडक दिली. या भीषण धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या तर अठरा वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे. सदरचा अपघात रविवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. रुक्मिणी परदेसी (36) व … Read more

यवतेश्वर घाटात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; कार पलटी होऊन युवक जखमी

Crime News 6

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर घाटात शनिवारी सकाळी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. पुण्याचा युवक दारू पिऊन चारचाकी गाडी चालवत होता. तोच गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात होऊन गाडी पलटी झाली. देव बलवत्तर म्हणून युवकाचे प्राण वाचले. सकाळी घाटात वाहनांची संख्या कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. पुण्याहून कास-यवतेश्वरला फिरण्यासाठी एक युवक शनिवारी सकाळी आला होता. … Read more

बंदुकीच्या छऱ्यामुळे जखमी झालेल्या 24 वर्षाच्या युवकाचा अखेर मृत्यू

Crime News 20241110 090340 0000

पाटण प्रतिनिधी | बंदुकीचा छरा लागल्याने एक युवक जखमी झाल्याची घटना पाटण तालुक्यातील नावडी येथे घडली होती. जखमी झालेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रसाद वामन जामदार (वय २४, रा. नावडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील नावडी गावात असलेल्या एका चौकात दि. २९ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही … Read more

शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेचा दारु वाहतुकीवर छापा; 63 हजार 865 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 5

सातारा प्रतिनिधी । शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या वतीने आज मोळाचा ओढा ते बुधवार नाका जाणाऱ्या मार्गावर अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाच्या वतीने अटक करत सुमारे 63 हजार 865 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारु व्यवसायांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक समीर … Read more

बिबट्याकडून तब्बल 16 कोंबड्यांचा फडशा; चाफळ परिसरात बिबट्याचा वावर

Crime News 4

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या लोकवस्तीतील दीपक उर्फ गोट्या सपकाळ यांच्या घराबाहेर ठेवलेल्या कपाटातील तब्बल १६ कोंबड्यांचा बिबट्याने फडशा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दीपक सपकाळ यांनी कोंबड्या पाळलेल्या होत्या. घराच्या बाहेरील बाजूस कोंबड्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी रात्री … Read more

कोरेगावात वसना नदीच्या पुलावर अपघात; बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Crime News 20241109 095518 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव- सातारा रस्त्यावर येथील रेल्वे स्टेशनजवळून वाहणाऱ्या वसना नदीच्या पुलावर काल रात्री पावणेदहाच्या सुमारास एसटी बसला समोरून धडक दिल्याने बुलेटस्वार जागीच ठार झाला. गजानन हिरामण जाधव (वय ३५, रा. सस्तेवाडी, वीस फाटा, ता. फलटण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-सातारा रस्त्याने कोरेगाव आगाराची सोलापूर- सातारा ही … Read more

वेण्णालेकवर पर्यटकांना मारहाण; महाबळेश्वरात सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20241109 082409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक परिसरात सद्या मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशीच मारहाणीची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक स्टॉलधारकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंकडून हाणामारीची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून, याप्रकरणी महाबळेश्वर … Read more

सातार्‍यातील 93 जण तडीपार; 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर

Crime News 20241109 075942 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका व बोरगाव पोलिस ठाणेअंतर्गत 93 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिले. तसेच सातारा शहर, शाहूपुरी व सातारा तालुका पोलिस ठाणेअंतर्गत 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधिकार्‍यांनी सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील … Read more