बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

leopard goats attack

कराड प्रतिनिधी । भरदिवसा बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील सुपने गावातीळ पवारमळा येथे मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन ते दिवसापासून सुपने परिसरातील शेत शिवारात बिबट्याचा वावर हा वाढला असल्याची चर्चा होती. गावातील व परिसरातील मळ्यातील … Read more

Satara News : महामार्गावर चालत्या ST बसने घेतला अचानक पेट; पुढं घडलं असं काही…

ST bus highway caught fire

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई या राधानगरी-स्वारगेट एसटी बसने अचानक पेट घेतला. सोमवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाक्याजवळ हि दुर्घटना घडली. एसटी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० ते ४० प्रवाशांचे प्राण वाचले. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाची … Read more

बोगस विवाह लावून घातला 4 लाख 25 हजाराचा गंडा; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

Karad Taluka Police Station

कराड प्रतिनिधी । विवाह होत नसल्याने विवाह इच्छुक तरुण वधुवर सूचक केंद्रात जाऊन आपले नाव देतात. त्याठिकाणी ठराविक पैसे भरून आपले बायोडाटा देतात. मात्र, त्यातील काहींचे विवाह होतात तर काहींचे राहतात. मात्र, अशामध्ये काहींची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशीच फसवणूक झाल्याची घटना कराड तालुक्यात घडली असून वधुवर सूचक असल्याचे सांगत विवाहासाठी दोन युवकांकडून 4 लाख … Read more

खंबाटकी घाटात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात : भरधाव कंटेनरने बाईकस्वाराला चिरडले

Santosh Raghunath Shilimkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने चिरडले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष रघुनाथ शिळीमकर (वय 43, रा. मंजाई असनी, ता. वेल्हे, जि. पुणे, सध्या रा. शिरवळ) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ सहकारी पतसंस्थेत 50 लाखांचा घोटाळा; चेअरमनसह 17 संचालकांविरुध्द गुन्हा दाखल

Shahupuri Police Station Satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात पतसंस्थांची मोठ्या संख्येने उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी व महिला आपले पैसे ठेवतात. या ठिकाणी पैसे ठेवल्यास आपले पैसे सुरक्षित राहतील असा विश्वास असतो. मात्र, काहीवेळा अनुचित प्रकारही घडतात. असाच फसवणुकीचा प्रकार सातारा जिल्ह्यातील सिध्दनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी येथील पतसंस्थेत घडला आहे. … Read more

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

Raviraj Dilip Kale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या युवकाचा विहिरीत घसरून पाय पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रविराज दिलीप काळे (वय 30, रा. काळगाव, ता. पाटण) असे युवकाचे नाव आहे. युवकाच्या मृत्यूमुळे काळगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ढेबेवाडी विभागातील काळगावमध्ये राहत असलेल्या 30 वर्षीय रविराज काळे … Read more

पुणे – सातारा मार्गावर ST बसची कंटेनरला धडक; अपघातात 2 प्रवाशी जागीच ठार

ST Bus container accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे – सातारा मार्गावर शिरवळजवळ एसटी आणि कंटेनरची भीषण धडक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून व महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

हॉटेल व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत 10 लाखांची मागितली खंडणी; 11 जणांच्या टोळीस अटक

Satara Robber Gang

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यात एका हॉटेल व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी 15 जणांच्या टोळीने मागितली होती. या प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी 15 जणांपैकी 11 जणांना अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 जून 2023 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मेणवली (ता. वाई जि. सातारा) … Read more

सरपंच, उपसरपंच यांच्या गटात हाणामारी; उंब्रज पोलीस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल

umbraj News

उंब्रज । सरपंच आणि उपसरपंच यांच्या गटात हाणामारी होऊन २० जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. घोट तालुका पाटण येथील उपसरपंच यांनी कोर्टात दावा दाखल केला. सरपंच यांनी गावातील अतिक्रमणासंदर्भात तारळी नदीत जलसमर्पण करणार असल्याच्या अर्जावरून दोन गटात लाकडी दांडके, दगडाने हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more