आई-बापासह दोन मुलं विकायचे दारू; पोलिसांनी जिल्ह्यातूनच केलं तडीपार

Crime News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील भुईंज परिसरात बेकायदा दारुची चोरटी विक्री करणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांच्या टोळी विरुद्ध सातारा पोलीसांनी तडीपारीची आदेश जारी केला आहे. याबतचा आदेश स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढला आहे. 1) टोळीप्रमुख अशोक वामन जाधव, (वय 55), टोळी सदस्य 2) सविता अशोक जाधव (वय 48), 3) अमर अशोक जाधव, … Read more

शॉर्ट सर्किटमुळे कोपर्डेतील 2 एकर ऊस झाला जळून खाक

2 Acres Of Sugarcane Fire 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद नजीक असलेल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील वीज वितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 2 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील गट क्रमांक 469 व … Read more

साताऱ्यात रानडुकराच्या शिकारीची बंदूक वनविभागाच्या हाती

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या हद्दीवर महादरीचे जंगलात रविवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सातारा शहराजवळ महादरे संरक्षण राखीव या जंगलात रानडुकराच्या शिकारीत वापरलेली बंदूक वनविभागाच्या हाती लागली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच जंगलात रविवारी काही पोलीस कर्मचारी सरावाचा भाग म्हणून महादरेच्या पायऱ्या चढून यवतेश्वर नजीकच्या पठारावर निघाले होते. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेतील एक रानडुक्कर पोलिसांना … Read more

अस्थिव्यंग शाळेत 13 लाखांचा अपहार, मुख्याध्यापकासह अधीक्षकावर गुन्हा दाखल

Dahiwadi Police News jpg

सातारा प्रतिनिधी | दहिवडी, ता. माण येथील अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेला अनुदानापोटी आलेले १३ लाख १ हजार ६२५ रुपये मुख्याध्यापक व अधीक्षकाने परस्पर खर्च करून अपहार केले. यावरून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम शिवाजी गोफणे (रा. सोमंथळी, ता. फलटण) असे मुख्याध्यापकाचे, तर अमोल मच्छिंद्र लांडगे (रा. खानोटा, ता. दौंड, … Read more

चरेगावमध्ये अपघातग्रस्त कारसह डिझेलचे 3 कॅन जप्त

Crime News 20231218 091502 0000 jpg

कराड प्रतिनिधी | चचेगाव, ता. कराड नजीक कराड – ढेबेवाडी मार्गावर महामार्ग पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका कार दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच कार चालकाने रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात धूम ठोकल्याची घटना रविवारी घडली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये डिझेलचे तीन कॅन संशयास्पदरित्या आढळून आले. याबाबत … Read more

पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाईंवर निलंबनाची कारवाई; खातेनिहाय चौकशीचे आदेश

Shirwal News jpg

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील अल्पवयीन मुलीने युवकाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी सांगवी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास अधिकारी शिरवळच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी फलटण पोलिस उपअधीक्षकाना … Read more

सातारा – लातूर महामार्गावर क्रेटाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा – लातूर महामार्गावर पुनवर्सन रोहोट बस स्टॅण्डसमोर दुचाकीला क्रेटाने समोरुन धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. बाळू शंकर साळुंखे (वय 55, रा. खडकी) असे मृताचे नाव आहे. ते पळशी येथे हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी शाळेत अर्धा दिवस भरुन इलेक्ट्रॉनिक मोटारसायकलवरुन क्रमांक … Read more

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या; नातेवाईकांनी मृतदेह घेऊन गाठले पोलीस ठाणे अन् घडलं असं काही…

Shirwal News jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. या घटनेनंतर खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईट नोटमध्ये युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर नातेवाईकांनी व सांगवी ग्रामस्थांनी विद्यार्थिनीचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले. व संबंधित … Read more

दुर्गादेवी विसर्जन मिरवणुक दुर्घटनेत भाजलेल्या 6 वर्षीय अलिनाची मृत्यूशी झुंज अपयशी

Mahabaleshwar News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत रात्री जनरेटरजवळील पेट्रोलच्या कॅनमधील पेट्रोल गळतीमुळे आग लागण्याची घटना घडली होती. यावेळी आगीत सहा वर्षांची अलिना सादिक नदाफ ही गंभीररित्या भाजली होती. गेल्या दोन महिन्यांपासून सूर्या सह्याद्री रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर शनिवारी तिची झुंज अपयशी ठरली. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर … Read more

रेल्वेच्या रिकाम्या ऑइल टँकरची चाके घसरली, पुढं घडलं असं काही…

Tandulwadi of Koregaon News jpg

सातारा प्रतिनिधी । रेल्वे गाडी घसरण्याचा घटना फार कमी घडतात. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम देखील गंभीर पहायला मिळतात. अशीच घटना पुणे – मिरज लोहमार्गावर कोरेगाव आणि सातारा रेल्वे स्थानकांदरम्यान तांदूळवाडी नजीक असलेल्या खिंडीजवळ शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणाहून मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरली. त्यामुळे सातारा … Read more

शासकीय गोदाम फोडून गहू, तांदूळ ठेवला घरात, स्थानिक गुन्हे शाखेनं 5 जणांना घेतलं ताब्यात

Crime News 02 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील नागठाणे येथील शासकीय गोदामातून गहू आणि तांदळाची पोती चोरीचा गुन्हा बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. तसेच एकाच्या झोपडीवजा घरातून चोरीचे धान्य हस्तगतही करण्यात आले. शिवाजी शामराव मोहिते, विनोद सिकंदर मोहिते, वामन लिंबाजी माने आणि हेमंत हणमंत साळुंखे … Read more

साताऱ्यातील धोम धरणाचा डावा कालवा फुटला, ऊसतोड मजुरांच्या झोपड्या, जनावरे गेली वाहून

Dhoom Dam News 20231216 082729 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील धोम धरणाचा भराव वाहून गेल्याने वाई तालुक्यातील ओझर्डे गावानजीक शनिवारी पहाटे धरणाचा डावा कालवा फुटला. यामुळे चंद्रभागा ओढ्याला पूर आला आहे. ऊसतोड मजुरांच्या ओढ्याकाठी उभारलेल्या झोपड्या आणि जनावरे पुरातून वाहून गेली आहेत. १२ बैलांना वाचविण्यात आले असून दोन बैलांचा शोध सुरू आहे. सध्या प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून कालवा बंद करण्यात … Read more