महिलेच्या पर्समधील 8 तोळे दागिन्यांवर ST चालकानेच मारला डल्ला, सातारा जिल्ह्यातील चालकास अटक

Crime News 14

सातारा प्रतिनिधी । ठाणे ते बेळगाव या एस.टी.बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील अडीच लाखाच्या आठ तोळे दागिन्यांवर एस.टी. चालकाने डल्ला मारल्याची घटना सोमवारी दि. २५ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली असून शाहूपुरी पोलिसांनी चालकाला मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. राजश्री आनंदा नलवडे (वय ४०, सध्या रा. ठाणे, मूळ रा. राशिंग, ता. … Read more

कुटुंबासमवेत फिरत असताना दुचाकीची बसली धडक; मलकापुरातील तरुण जागीच ठार

Crime News 20241127 092055 0000

कराड प्रतिनिधी | घरापासून काही अंतरावरच कुटुंबासमवेत शतपावली करताना भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला. पत्नी, मुलगा, मुलीच्या डोळ्यासमोरच ही घटना घडली. कराड – ढेबेवाडी गणेश कॉलनीत सोमवार साडेनऊच्या सुमारास अपघात प्रसाद संतोष इनामदार (वय ४१, रा. गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. अपघातानंतर कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक … Read more

संजय पाटील खून प्रकरणात लाखाची नुकसान भरपाई; तत्कालीन पोलिस निरीक्षक संभाजी पाटलांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Crime News 20241127 082719 0000

सातारा प्रतिनिधी | कराड तालुक्यातील आटके येथील महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा तब्बल १५ वर्षांपूर्वी खून झाला होता. त्याचा तपास कराड शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केला होता. त्यांच्या तपासाचे चुकीचे निष्कर्ष काढून त्यांना त्यात अटक झाली होती. ती अटक अवैध आहे, असा आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. त्या … Read more

खंडाळ्याच्या खंबाटकी घाटात आढळला महिलेचा मृतदेह

Crime News 20241127 074114 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये बेंगरुटवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित युवतीचा घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण आले असून अन्य ठिकाणी घातपात करत सेफ झोन मानल्या गेलेल्या डपिंग ग्राऊंड अर्थात खंबाटकी घाटामध्ये मृतदेह टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा … Read more

म्हाताऱ्याला संपवून दोघांनी दुसऱ्या जिल्ह्यात आणला; अखेर पोलिसांनी फलटणमध्ये ठोकल्या बेड्या

Crime News 13

सातारा प्रतिनिधी । चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकताच एक खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. इंदापूरमधील मौजे तावशी गावात ही घटना घडली होती. ज्येष्ठ नागरिकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघे आरोपी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहेत. हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४ रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. … Read more

उंडाळे परिसरात बिबट्याच्या मादीसह दोन बछड्यांचा धुमाकूळ

Karad News 20241126 084438 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील तुळसण, शेवाळेवाडी- उंडाळे रस्त्यावर गेल्या आठवड्यापासून दिवसासह रात्री मोटारसायकल स्वारांचा बिबट्याकडून पाठलाग होत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. रविवारी रात्री मोटारसायकल स्वाराचा पाठलाग करून मागे बसलेल्या मुलावर बिबट्याने पंजा मारला. त्यात तो जखमी झाला. गावाच्या पर्वेकडील महादेव मंदिर … Read more

बिबट्याचा दुचाकीवरून निघालेल्या वडील अन् मुलावर हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Karad News 20241125 212754 0000

कराड प्रतिनिधी | एका शाळेजवळ दुचाकीवरून निघालेल्या पिता पुत्रावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना कराड तालुक्यातील उंडाळे येथील शेवाळवाडी रस्त्यावर घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत शेवाळे हे मुलगा प्रतीकला घेवून दुचाकीवरून उंडाळे येथे आठवडी बाजारासाठी आले होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास बाजार करून परत जात असताना शेतातून अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला … Read more

टँकर अन् दुचाकीच्या अपघातात महिला जागीच ठार; लोणंद-सातारा रस्त्यावरील सालपे घाटातील घटना

Accident News

सातारा प्रतिनिधी । लोणंद राष्ट्रीय महामार्गावर सालपे ता. फलटण गावच्या हद्दीत सालपे घाटात भरधाव वेगात आलेल्या टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. काल रविवार दि. 24 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. तनुजा नितेंद्र अनपट (वय 31, रा. अनपटवाडी ता. कोरेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. … Read more

मंदीरातील देवीचे सोने चोरणारा चोरटा 12 तासात जेरबंद

Crime News 20241123 204755 0000

सातारा प्रतिनिधी | देवीच्या मंदिरातील सोनेचोरणाऱ्या संशयितास बोरगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद केले. अनिल अशोक धुमाळ (मूळ रा. कार्वे, ता. कराड, सध्या रा. सासपडे, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 19/11/2024 रोजी रात्री 09.30 वा. ते दिनांक 20/11/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. चे दरम्यान मौजे सासपडे ता. … Read more

सांगली MIDC मधील केमिकल कंपनीत वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू, जखमींना कराडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Karad News 50

कराड प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आगीमध्ये 9 लोक अत्यावस्थ झाले होते, यातील 7 जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन महिलांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलांपैकी एक महिला सातारा … Read more

कश्मिरासह चौघांकडून 14 कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Crime News 20241122 100342 0000

सातारा प्रतिनिधी | फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कश्मिरा पवारसह तिच्या चार साथीदारांवर भारतीय संरक्षण मंत्रालयातील टेंडर देण्याचे आमिष दाखवून १४ कोटी ४९ लाख रुपये ५० हजार १६३ रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. कश्मिरा संदीप पवार (रा. सदरबझार), गणेश हरिभाऊ गायकवाड (रा. गडकर आळी), युवराज भीमराव झळके … Read more

दुकानाला आग लागून 5 लाखांचे नुकसान; वडजलमध्ये शॉटसर्किटमुळे घटना

Crime News 20241122 090333 0000

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील वडजल येथील हॉटेल स्वराज किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागून रोख रकमेसह दुकानातील इतर साहित्य जळून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील वडजल येथील निखिल सुभाष काटकर यांनी शेतीला जोड धंदा म्हणून हॉटेल जनरल स्टोअर्स हा व्यवसाय … Read more