भुईंजमधून तिघांचे अपहरण, वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला चाकूने भोसकलं

Crime News 20241130 091446 0000

सातारा प्रतिनिधी | भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. जखमी जावली तालुक्यातील असून संशयित आरोपीच्या तपासासाठी भुईज पोलीस पथक रवाना झाले आहे. याबाबत भुईंज पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मयुर विकास जाधव (वय २६ वर्षे रा. शेते ता. जावली) हा आपले दोन सहकारी (जुबेर शेख रा. कुडाळ … Read more

सावकारीप्रकरणी वडूज येथील एकावर गुन्हा दाखल; साडेसहा कोटींची केली मागणी

Crime News 20241130 081933 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अजूनही सावकारीच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवानीचे प्रकार सुरू आहे. या सावकारी प्रकारावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. दरम्यान, जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दलीचे पैसे व्याजासह परत करूनही साडेसहा कोटी रुपयांची मागणी करत दमदाटी केल्याप्रकरणी खटाव तालुक्यातील वडूज येथील सावकारावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनोज विठ्ठल माने असे सावकारीचा … Read more

सातारा बसस्थानकातील कचरा कुंडीत आढळले नवजात अर्भक

Satara News 20241129 213729 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील कचरा कुंडीत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी वंदना दिलीप भंडारे (रा. कुरुल सावली, ता. सातारा. सध्या रा. गुरुवार पेठ सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार हा गुन्हा नोंद झालेला आहे. दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच … Read more

सातारा परिसरात दोन घरफोड्या; 80 हजाराचा ऐवज लंपास

Satara News 20241129 100931 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. दोन ठिकाणी करण्यात आलेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संगमनगर येथील घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व इतर साहित्य असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत बेगम नजीर शेख (रा. संगमनगर) … Read more

25 एकरांवरील ऊस जळाला; विहेतील शेतकऱ्यांचे 40 लाखांचे नुकसान

Fire News 20241129 082014 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील विहे येथील चव्हाण मळा शिवारातील २५ एकरांवरील ऊस आग लागून जळाला. यात सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्या आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विहे (ता. पाटण) येथील जुने विहे येथील … Read more

हॉटेलचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक, कारसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News 20241128 214013 0000

सातारा प्रतिनिधी | हॉटेल साहित्य चोरणाऱ्या तिघांना बोरगाव पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरेलेले वाहन असा एकुण 8 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शंकर जयवंत शिंदे (रा. सोनगाव निंब, ता. जि. सातारा), राज सतीश दनाणे (रा. वनवासवाडी, ता. जि. सातारा), प्रज्वल वसंत जाधव … Read more

सासपडे येथील देवीच्या अंगावरील दागिने चोरणारा संशयित जेरबंद

Crime News 20241128 140227 0000

सातारा प्रतिनिधी | सासपडे (ता. सातारा) गावाच्या हद्दीत महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिन्यांच्या चोरीप्रकरणी बोरगाव पोलिसांनी एकास अटक केली. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे देवीचे डोरले जप्त करण्यात आले आहे. अनिल अशोक धुमाळ (वय 34, मूळ रा. कार्वे ता. कराड सध्या रा. सासपडे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवीच्या … Read more

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारे कुरेशी टोळीतील पाचजण 2 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार

Crime News 20241128 120322 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात पोलिसांच्या वतीने नुकतीच धडक कारवाई करण्यात आली आहे. गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल करणाऱ्या कुरेशी टोळीतील पाच जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आहे. कुरेशी टोळीचा प्रमुख तय्यब आदम कुरेशी, आरीस गफुर कुरेशी, बिलाल रफिक कुरेशी, झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी आणि आबु ऊर्फ अल्ताब अफसर … Read more

साताऱ्यातील पोवई नाक्यावरील दुकानाला लागली भीषण आग

Crime News 20241128 101505 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याच्या पोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला मंगळवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचार्‍यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग आटोक्यात आणली. याबाबत अधिक माहिती अशी की, दुकानात नेहमीप्रमाणे दुकानातील कर्मचारी कामात … Read more

लिव्ह इन पार्टनरची हत्या करून आरोपीनेच दिली मिसिंगची तक्रार, पोलिसांनी गुन्ह्याचा ‘असा’ लावला छडा

Crime News 20241128 093126 0000

सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवून सातारा पोलिसांनी अवघ्या काही तासात हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला. खून झालेली महिला पुण्यातील वाकड परिसरातून बेपत्ता होती. खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या महिलेची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. लिव्ह इन रिलेशन संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असल्यानं … Read more

कराडच्या पंकज हॉटेलसमोर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात मसूरच्या महिलेचा जागीच मृत्यू

Karad News 20241128 083311 0000

कराड प्रतिनिधी | दुचाकीला भरधावअज्ञात वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला. पुणे – बंगळूर महामार्गावर कराड येथील पंकज हॉटेलसमोर बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. प्रियांका अमोल जाधव (वय ३१, रा. संजयनगर, मसूर, ता. कराड) असे अपघातात ठार … Read more

साताऱ्याच्या नागठाणेतील उरमोडी नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Satara News 2024 11 27T191741.673

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. श्रीमती शीतल श्रीरंग देसाई वय (रा.चंदन नगर कोडोली सातारा) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदी पात्रात काल दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता आका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना … Read more