शाहुपुरी पोलिसांनी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, साडे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News 20240912 162615 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत चोरट्यांच्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही टोळी मराठवाड्यातील असून त्यात चार महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल, रोकड आणि चारचाकी वाहन, असा साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहुपूरी पोलीस ठाण्यातील गुन्हे … Read more

साताऱ्यात डीजे, वाद्ये रात्री 12 पर्यंतच सुरू राहणार

Satara News 20240912 151506 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या पाच दिवसापासून सातार्‍यात गणेश आगमन मिरवणूक ते विसर्जन दिवस डिजे वाजणार की नाही, यावरून चर्चा सुरू असल्याने गणेश मंडळांकडून डीजे आणि वाद्य वाजविण्याबाबत मागणी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्यास वाद्यांवर कारवाई केली जाणार असून रात्री बारानंतर सर्व वाद्ये बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणेच होणार … Read more

सासरच्या छळास कंटाळून प्राध्यापिकेने संपविली जीवनयात्रा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240912 081741 0000

सातारा प्रतिनिधी | माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणार्‍या छळास कंटाळून पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील प्रा. सौ. प्रियांका रणजित पाटील (वय 31) हिने राहत्या घरात फॅनला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी कराड तालुक्यातील आहेत. पती रणजित … Read more

साताऱ्यात ऐन गणेशोत्सवात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत, 18 जणांना घेतला चावा

Satara News 20240912 065945 0000

सातारा प्रतिनिधी | ऐन गणेशोत्सवात साताऱ्यात चार तास पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत १८ जणांना चावा घेतल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या नागरीकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मोती चौक, राधिका चौक, कोटेश्वर मंदिर परिसरात हा थरार सुरू होता. नगरपालिकेच्या २५ मुकादमांचे पथक कुत्र्याच्या शोधार्थ रवाना करण्यात आलं आहे. सातारा … Read more

कराड तालुक्यातील गोळेश्वरमध्ये युवकावर कोयत्याने वार

Crime News 20240911 082004 0000

कराड प्रतिनिधी | “न्यायालयात दाखल खटला मागे घे,” असे म्हणत एका युवकावर दोघांनी कोयत्याने वार केल्याची घटना कराड तालुक्यातील गोळेश्वर गावात घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी सत्यवान अदलिंगे (वय 30, रा. गोळेश्वर) असे जखमी युवकाचे नाव आहे. तुकाराम सुभाष माळी (रा. गोळेश्वर) व गणपती नागनाथ माळी (रा. … Read more

तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास लोणंद पोलिसांनी सोलापुरातून घेतलं ताब्यात

Crime News 20240910 202015 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद पोलीसांच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ऋषीकेश केशव जमदाडे (रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.०१/०६/२०२४ रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा येथील एक १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यात शिवशाही गाडीने घेतला पेट; प्रवासी…

Satara Crime News 20240910 155925 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील वाढेफाटा हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना आज मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. यावेळी गाडीतून २१ जण प्रवास करत होते. चालक – वाहकांने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराची (एमएच ०६ … Read more

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त

Satara Crime News 20240910 151125 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच कोंबींग ऑपरेशनची कारवाई केली. यामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, २ मोटार सायकल असा २ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी … Read more

GST आयुक्त वळवींच्या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठाचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश

Satara News 20240910 140522 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील झाडाणी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, गुजरात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांचा मूळ पत्ता शोधून आठवड्यात त्याचा तपशील सादर करावा, जेणेकरून झाडाणी प्रकरणात त्यांना प्रतिवादी ठरवून कामकाज पाहता येईल, असे निर्देश पुण्यातील … Read more

महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक, CID च्या अप्पर पोलीस अधीक्षकास अटक, 5 दिवस कोठडी

Crime News 20240909 081645 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी, … Read more

सातार्‍यात तब्बल 97 जणांना तडीपारीचा दणका

Satara News 20240909 071655 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सातारा शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील 97 जणांना तात्पुरत्या तडीपारीचा दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने गल्ली बोळातील भाईगिरी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, 12 दिवसांची तात्पुरत्या तडीपारीची ही कारवाई आहे. गणेशोत्सव निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व … Read more

फलटण पोलिसांचा 10 डीजे मालकांना दणका, आवाजाची मर्यादा ओलांडल्यानं कारवाई

Crime News 20240908 192905 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरात गणेश चतुर्थी दिवशी अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या मिरवणुका काढल्या. परंतु मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या १० डीजे मालकांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे डीजे मालकांचे धाबे दणाणले आहेत. फलटणचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, हवालदार चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, मुकेश घोरपडे, … Read more