ओगलेवाडीत 110 तोळ्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लुटी प्रकरणी 24 तासात 2 संशयित ताब्यात, मुद्देमाल हस्तगत

Karad Crime News

कराड प्रतिनिधी | ऐन दिवाळी सणात कराडजवळच्या ओगलेवाडी गावात बंद घर फोडून चोरट्यांनी ११० तोळे दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे ओगलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी चोवीस तासाच्या आत घरफोडीचा छडा लावत दोन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे. स्थानिक उद्योजकाच्या बंगल्यात चोरी ज्या बंगल्यात चोरी झाली … Read more

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ई-सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

Crime News 2

सातारा प्रतिनिधी । भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला संबंधित इसम परराज्यातील … Read more

उंब्रज पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई; 86 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 1

कराड प्रतिनिधी | उंब्रज ते सासपडे मार्गावर मोटरसायकलवरून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना उंब्रज पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ८६ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. तानाजी मुरलीधर कमाणे (वय ४१) व हर्षद सुनिल जाधव (वय २१, दोघे रा. सासपडे, ता. … Read more

ओगलेवाडीत चोट्यानी घरफोडी करत तब्बल 110 तोळे सोने केले लंपास

Crime News 20241105 084845 0000

कराड प्रतिनिधी | लक्ष्मीपूजनानिमित्त घरात आणलेले सुमारे 110 तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना ओगलेवाडी (ता. कराड) परिसरात घडली आहे. एका उद्योजकाचे बंद घर फोडून हा चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रोकड, मद्य, वाहनांसह 1 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त, 45 जणांवर गुन्हा नोंद

crime News 20241103 093040 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शिरवळ हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उध्दवस्त केला. पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगाराच्या साहित्यासह रोकड, विदेशी दारू, दुचाकी, … Read more

पंढरपूर रस्त्यावरील बरड गावच्या हद्दीत पहाटे भीषण अपघात; 3 ठार तर गाडीचा झाला चक्काचूर

Crime News 1 2

सातारा प्रतिनिधी । दिवाळीच्या सणादिवशी एक भीषण अपघाताची घटना फलटण तालुक्यात घडली आहे. फलटण तालुक्यातील पंढरपूर रस्त्यावर बरड गावच्या हद्दीत चार चाकी गाडीचा पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, विजापूर (कर्नाटक) हुन पाडेगाव येथील … Read more

कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विनापरवाना सोयाबीन खरेदी करणार्‍यांवर कारवाई

Crime News 20241031 094957 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या आणि त्यांच्यावर अन्याय करणार्‍या व्यापार्‍यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीवरुन कुमठे येथे व्यापार्‍यावर बुधवारी दुपारी 12 वाजता बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून 33 हजार 371 रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. बाजार समितीचा … Read more

त्रिपुटी खिंडीत अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

Crime News 20241031 090330 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव- सातारा रस्त्यावर त्रिपुटी खिंडीजवळ अपघाताची घटना घडली असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुटी खिंडीत दुकाचीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोन जण ठार झाले. राहुल अंकुश जाधव (रा. ल्हासुर्णे) असे एका मृताचे नाव असून, दुसऱ्याचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. आज सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. खिंडीच्या … Read more

कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याच्या रागातून बँक मॅनेंजरवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, संशयिताला अटक

Crime News 20241031 072044 0000

कराड प्रतिनिधी | साताऱ्यात इंडियन ओवरसीज बॅंकेच्या मॅनेजरवर तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शेळी पालनासाठी कर्ज लवकर मंजूर होत नसल्याच्या रागातून तरुणाने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कराड शाखेतील मॅनेंजरवर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आशिष कश्यप (मूळ रा. बिहार) हे गंभीर … Read more

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सोन्या चांदीच्या दागिण्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara News 29

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली आहे. पथकाने आकाश अटक करीत त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निलेश अंकुश काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर … Read more

सज्जनगड रस्त्यावर जीप कोसळली थेट दरीत; अपघातात दोघेजण जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Satara News 27

सातारा प्रतिनिधी | सातारा-सज्जनगड रस्त्यावर दुभाजक तोडून पन्नास फूट खोल दरीत जीप कोसळून दोनजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातून काहीजण जीप शिकण्यासाठी सज्जनगड सातारा रस्त्याने जात होते. बोगदा ओलांडल्यानंतर छोट्या घाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे जीप पन्नास फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी … Read more

हवाला रक्कम लूटप्रकरणी आसिफ शेखला अटक; 1 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Karad News 18

कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर महामार्गावरील कराड तालुक्यातील मलकापूर हद्दीत हवालाची तीन कोटी रुपयांची रक्कम लुटणाऱ्या टोळीतील प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या आसिफ सलीम शेख या संशयिताला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकापूरमधील ढेबेवाडी … Read more