चोरी केलेली दुचाकी विकायला गेला अन पोलिसांच्या हाताला लागला; कराड पोलिसांची कारवाई

Karad Taluka Police Station 1 1

कराड प्रतिनिधी । चोरी केलेली दुचाकी विकताना एकास अटक करण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोरट्यास कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने सापळा लावून अटक केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. सुनिल श्रीपती गावडे (वय 35) रा. येलुर ता. वाळवा जि.सांगली असे अटक केलेल्या युवकाचे … Read more

रात्री शेतात पार्टी चालू असताना तरुणाचा खून; पोलीस पाटलांच्या Whatsapp ग्रुपमुळे असा लागला छडा

Medha News

मेढा | रात्री शेतात जेवणाची पार्टी चालू असताना झालेल्या वादावादीतुन एका तरुणाचा खून झाल्याची घटना मेढा येथे घडली आहे. पोलिसांना मिळालेला मृतदेहाची ओळख न पटल्याने खुनाचा तपास करणे अवघड झाले होते. यापार्श्वभूमीवर सदर मृत अनोळखी व्यक्तीची माहिती पोलीस पाटील यांच्या whatsapp ग्रुपवरून व्हायरल करण्यात आली. यानंतर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यास मदत झाली आणि अखेर खुनाचा … Read more

उधारीचे पैसे मागितले म्हणून तिघांनी चाकू काढत थेट केला खुनाचा प्रयत्न; पण पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 1 1

सातारा प्रतिनिधी । एखाद्याला उधार पैसे दिले तर परत वारंवार मागणाऱ्याचा राग हा उधार घेणाऱ्या व्यक्तीला येतोच. कधी कोण पैसे परत देतो तर कधी कोण देठी नाही. मात्र, उधारीच्या पैशापायी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जाणे हि खूप गंभीर घटना आहे. अशीच घटना सातारा शहरात घडली आहे. जुनी उधारी मागितल्याच्या कारणावरुन चिडून जावून तीन जणांनी एकाला जीवे … Read more

‘7 हजार रुपये द्या घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवतो,’ म्हणणारा जंगू बाबा अडकला सापळ्यात

Crime News

सातारा प्रतिनिधी । घरावर पितृदोष असून कोणीतरी करणी- भानामती केली आहे. हा दोष काढण्याचे आश्वासन देऊन 3 हजार 500 रुपयांना गंडा घालणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील अंभेरीतील भोंदू बाबाला रहिमतपूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंगू अब्दुल मुलाणी (वय 72, रा.अंभेरी, … Read more

शाहूपुरी पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; 20 जण ताब्यात, 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News (1)

सातारा प्रतिनिधी । सातार्‍यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनालाबरोबर घेत धडक कारवाई केली आहे. यावेळी सुमारे 20 टपरी चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे तर सुमारे 2 लाखांचा गुटखा शहर परिसरातून हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात अवैध गुटख्याची विक्री होत असल्याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळत होती. … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एकाला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय

कराड प्रतिनिधी । कराड येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्यावतीने काल एकास सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. संतोष शिवाजी बागल (वय 26, रा. मलकापूर, ता. कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाने दिलेल्या … Read more

भरधाव कंटेनरने रस्ता ओलंडणाऱ्या महिलेस चिरडले

Container Accident News

कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते मलकापूर हद्दीत सध्या पूल पाडण्यात आला असून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सारखी वर्दळ राहत आहे. मलकापूर शहराच्या हद्दीतीलहॉटेल धनी येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात महिला जागीच ठार झाली. अपघातात ठार … Read more

टक्केवारीचे आमिष दाखवत केली 50 लाखांची फसवणूक; 3 जणांवर गुन्हा दाखल

Karad Police Station

कराड प्रतिनिधी । कराड शहरात फसवणुकीच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीही एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. प्राईमबुल्स मल्टीकॉन कंपनीत पैसे गुंतवल्यास प्रति महिना ४ टक्के परतावा मिळतो असे सांगत तिघा जणांनी अनेक जणांची तब्बल 50 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात तिघा जनावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या … Read more

कराडसह परिसरातील चोरीच्या 6 दुचाकीसह 2 चोरट्यांना अटक

karad News

कराड प्रतिनिधी । कराड शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. दुचाकी चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली जात असल्याने कराडातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्यावतीने काल सोमवारी रात्री धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यामध्ये रात्री दहा ते बारा या वेळेत पेट्रोलिंग व नाकाबंदीद्वारे तब्बल 6 दुचाकीसह 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात … Read more

मटणाच्या जेवणावर मारला ताव नंतर तब्बल 23 जणांना झाली विषबाधा; एकाचा मृत्यू

Food Poisoning News

कराड प्रतिनिधी । यात्रेच्या मटणाच जेवण असलं की आधी हाताच्या भाहया मागे सारायच्या मग तांबडा, पांढरा रस्सा पित मटणावर ताव मारायचा, असं चित्र यात्रेतील घराघरात बघायला मिळत. मात्र, हेच मटणाचं जेवण जीवानिशी बेतेल असं वाटलं नव्हतं. कारण मटणाच्या जेवणातून एक नाही दोन नाही तर तब्बल 23 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका जणाचा … Read more

पोहण्यासाठी 10 वीच्या अनिकेतनं टाकली उडी; पुढं घडलं असं काही…

Nira Right Canal News

सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकजण तलाव, कालवा तसेच नदीकाठी पोहायला जात आहेत. मात्र, पोहताना अनेकांच्या जीवाशी येत आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे मंगळवारी सकाळी घडली आहे. येथील निरा उजव्या कालवा परिसरात गेलेल्या शाळकरी मुलाने पुलावरून कालव्यात उडी टाकली. मात्र, पोहता नीट येत नसल्याने तो बुडाला होता. त्यातच कालव्यातील पाण्याचा वेग … Read more

बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

leopard goats attack

कराड प्रतिनिधी । भरदिवसा बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील सुपने गावातीळ पवारमळा येथे मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन ते दिवसापासून सुपने परिसरातील शेत शिवारात बिबट्याचा वावर हा वाढला असल्याची चर्चा होती. गावातील व परिसरातील मळ्यातील … Read more