सातार्‍यातील 93 जण तडीपार; 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर

Crime News 20241109 075942 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका व बोरगाव पोलिस ठाणेअंतर्गत 93 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिले. तसेच सातारा शहर, शाहूपुरी व सातारा तालुका पोलिस ठाणेअंतर्गत 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधिकार्‍यांनी सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील … Read more

राज्य उत्पादन शुल्कची पाल गावच्या हद्दीत अवैध दारु वाहतूकीवर कारवाई; दुचाकी, दारुसह मुद्देमाल हस्तगत

Crime News 20241108 215815 0000

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कराड तालुक्यातील पाल गावच्या हद्दीत काशीळ – पाल रोडवर बेकायदेशीर देशी दारूची वाहतूकीवर कारवाई करत एकास अटक केली. देशी दारू व ताडीचा एकुण ११ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्येमाल तसेच वाहनासह एकुण ५६ हजार ५५० रुपये किंमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

सातारा, शिरवळ अन् पुसेगावात अवैध देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या तिघांना अटक; 13 लाख 30 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

Satara News 46

सातारा प्रतिनिधी । सातारा, शिरवळ व पुसेगांव याठिकाणी अवैध देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यांवर पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई केली आहे. तिघा जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १३ लाख ३० हजार ७१५ रुपये किंमतीचा प्रोव्हीबिशन मुद्देमाल जप्त केला आहे. १) अमोल शंकर नलवडे (वय ३४, रा. वेळे ता वाई जि सातारा), २) राजेंद्र शंकरराव जावळे (वय ५५, रा … Read more

कोरेगावात होरपळून दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू

Crime News 20241108 095148 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव येथील आरफळ कॉलनीनजीक असलेल्या एका शेळ्या- करडांच्या गोट्यास अज्ञातांनी काल रात्री दीडच्या सुमारास आग लावल्यामुळे दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, छप्पर जळून गेले आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की येथील नगरपंचायतीच्या रस्ते दिवाबत्ती विभागातील कर्मचारी ओंकार राजू गायकवाड (रा. अण्णा भाऊ … Read more

कोळेनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Karad News 20241108 091532 0000

कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी रस्त्यावर कोळेनजीक बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. रस्त्यावर अचानक बिबट्या आल्यानंतर वेगात असणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की कोळे- शिंगणवाडीदरम्यान रस्त्यालगत आज सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव … Read more

ओगलेवाडीतील 110 तोळे दागिन्यांच्या दरोड्यामागे जावई अन् सासऱ्याचाच हात; 3 दिवसाची पोलिस कोठडी

Crime News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओगलेवाडीत दरोडा टाकून सुमारे ८८ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रूपये लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासात दोघा संशयितास ताब्यात घेतले होते. या प्रकरणात कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करत त्यांच्याकडून ८८ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख … Read more

अवैध दारूप्रकरणी तिघांवर गुन्हे; 2 लाख 61 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Koregaon News 20241107 093640 0000

सातारा प्रतिनिधी | अवैध दारू वाहतूकप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सातारा निरीक्षकांच्या भरारी पथकाने सातार्‍यातील राधिका रोडवर येथील दोघांवर तर वाई-महाबळेश्वर निरीक्षकांनी मेढा येथे कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे 2 लाख 61 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची … Read more

कंटेनरला कारची पाठीमागून धडक; रायगावात अपघातात कार चालकाचा मृत्यू

Crime News 20241106 085721 0000

सातारा प्रतिनिधी | रायगाव (ता. सातारा) हद्दीत महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली. या घटनेत कारचालकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. दिलीप भास्कर सातपुते (वय २९, रा. नागोळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), सुरेखा अशोक होलमुखे (वय ४७, रा. करवडी, ता. सातारा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारचालक दिलीप भास्कर सातपुते … Read more

शिरवळात विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत संपवले जीवन; पती, सासू, पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

Crime News 20241106 083519 0000

सातारा प्रतिनिधी | शिरवळ ता. खंडाळा येथील सटवाई कॉलनीतील विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. मोमीना शाहरुख पठाण (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त तसेच हुंड्याकरिता जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू व पतीचा मित्र या तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील मोमीना शेख … Read more

राज्य उत्पादन शुल्कची अवैध दारु वाहतुकीवर कारवाई; वाहनासह 7 लाख 86 हजार मुद्देमाल जप्त

Crime News 3

सातारा प्रतिनिधी । आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाच्या वतीने आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी पुणे कडून साताराच्या दिशेने येणारी बेकायदेशीर देशी / विदेशी दारु व बिअरची वाहतूक पकडून दोघांना अटक करीत वाहनासह एकूण ७ … Read more

साताऱ्यातील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त; पोलीस विभागासह भरारी पथकाची संयुक्त कारवाई

Crime News

सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत सोनगाव तर्फ येथे पोलिस विभाग आणि भरारी पथकाच्यावतीने नुकतीच संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या … Read more

ओगलेवाडीत 110 तोळ्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लुटी प्रकरणी 24 तासात 2 संशयित ताब्यात, मुद्देमाल हस्तगत

Karad Crime News

कराड प्रतिनिधी | ऐन दिवाळी सणात कराडजवळच्या ओगलेवाडी गावात बंद घर फोडून चोरट्यांनी ११० तोळे दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे ओगलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी चोवीस तासाच्या आत घरफोडीचा छडा लावत दोन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे. स्थानिक उद्योजकाच्या बंगल्यात चोरी ज्या बंगल्यात चोरी झाली … Read more