CRIME NEWS : ऊसाच्या शेतात लघवीला जाणे आलं अंगलट, 7 हजार रुपयांचा बसला फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी (Crime News) । अनेकदा आपण रस्त्याकडेला बिनधास्त गाडी लावतो. रस्ता ग्रामीण भागातील असे तर गाडी पार्किंग करून अनेकजण फोनवरसुद्धा बोलत असतात. मात्र आता वर्दळ नसलेल्या रस्त्यालाही असे एकटे थांबणे अंगलट येऊ शकते. फलटण तालुक्यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला असेच रस्त्याकडेला गाडी लावून ऊसाच्या शेतात लघवीला जाणे अंगलट आले आहे. यामध्ये त्याला ७ हजार रुपयांचा फटका सोसावा लागला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ४ वाजेच्या दरम्यान गणेश घाडगे (राहणार खटाव) नावाचा तरुण युनिकोर्न टुव्हीलर वरून प्रवास करत होता. यावेळी दुपारी जेवणाकरता तो फलटण तालुक्यातील ढवळपाटी गावाजवळ जेवणासाठी थांबला. यावेळी रस्त्याकडेला दुचाकी लावून एका पिंपळाच्या झाडाखाली त्याने जेवण केले. नंतर शेजारील ऊसाच्या शेतात लघवीची गेला असता चोरट्यांनी सदर युवकाची दुचाकीला अडकवलेली बॅग लंपास केली.

दरम्यान, या घटनेनंतर गणेश घाडगे यांनी फलटण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. घाडगे यांचा ७००० रुपये किमतीचा सॅमसंग टॅब चोरट्यांनी पळवला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फलटण ग्रामीण पोलीसचे पोलीस हवालदार पिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागरिकांनी एकट्याने सुनसान भागातून प्रवास करताना खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.