कराड प्रतिनिधी (Crime News) । मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री घरफोडी आणि दरोडा अशा घटना घडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री कराड शहरातील डॉक्टर शिंदे यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी तब्बल ४६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. आता या घटनेचे सीसीटिव्ह फुटेज समोर आले असून दरोडा टाकून बॅगाभरून पसार होताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
पुजा राजेश शिंदे (वय 45 वर्षे) व्यवसाय -दवाखना चालक, रा. शिंदे मळा बाराडबरी रोड, कराड यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत दरोडा कसा पडला याची माहिती दिली आहे. पूजा शिंदे यांच्या सोबत त्यांचे पती राजेश मारुती शिंदे होलीस्टींग हिलींग सेंटर नावाचा दवाखना चालवितात. सदर दवाखान्याच्या आवारात पाठीमागील बाजुस त्यांचा राहता बंगला आहे. तेथे त्या पती राजेश, मुलगी मधुरा (वय 22 वर्षे) (अंपग) मुलगा आद्विक (वय 8 वर्षे) नंणद उर्मिला व वडील मारुती शिंदे (वय 49 वर्षे) असे एकत्र राहतात.
कराड येथे मध्यरात्री डाॅ. शिंदे यांच्या घरावरील दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर pic.twitter.com/nPmJ3q8J00
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 10, 2023
राजेश शिंदे यांना गेले सुमारे 6 वर्षापासुन तोंडाचा कॅन्सर आहे. त्याचेवर उपचार चालु आहेत. पुर्वी त्यांचे तोंडाचे ऑपरेशन झाले आहे. आज दिनांक 10/07/2023 रोजी त्यांचे ऑपरेशनची कृष्णा हॉस्पिटल कराड येथुन तारिख मिळाली होती. पती चे ऑपरेशन असलेने आई शकुंतला रामकृष्ण पाटील रा, कोल्हापुर या घरातील व मुलीची देखभाल करण्यासाठी आल्या आहेत. तसेच ऑपरेशनसाठी मोठा खर्च लागणार असल्याने घरामध्ये लाखो रुपयांची कॅश होती.
घरामध्ये दागिने अन पैसे असल्याची चोरट्यांना माहिती असल्यानेच संधी साधून त्यांनी रात्रीचा दरोडा टाकला असण्याची शक्यता आहे. दरोड्याची घटना कशी घडली याबाबत डॉक्टर शिंदे यांची पत्नी पूजा यांनी थरारक घटनाक्रम सांगितला. पूजा शिंदे यांनी सांगितले कि, पती राजेश यांचे ऑपरेशनचा खर्च डॉक्टरांनी जास्त सांगितला होता म्हणुन मी व पती असे 15 ते 20 दिवसांपासुन नातेवाईक यांचे कडुन पैसे उसने घेण्याचे चालु केले होते. माझा भाऊ प्रदिप रामकृष्ण पाटील यांचे कडुन सुमारे 8 दिवसापुर्वी 5 लाख रुपये रोख घेतले होते.
माझे दाजी मोहन पाटील रा. सांगली यांचे कडुन 5 लाख 50 हजार रु रोख घेतले होते. तसेच आई श्रीमती शंकुतला या कोल्हापुरवरुन काल तारिख 09/07/2023 रोजी रात्रौ.08.00 वा आल्या आहेत. त्यांनी येताना सोबत 2लाख रुपये रोख आणले होते ते पैसे तिचे पिशवीमधे होते. सुमारे 1 महिण्यापासुन आमचे हॉस्पिटलचे औषधाचे तसेच इतर बिल कोणाला दिलेले नाही त्यामुळे घरामधे सुमारे 14 लाख रुपये शिल्लक होते अशी माहिती पूजा शिंदे यांनी पोलिसांना दिली आहे.
बहिण स्नेहलता पाटील रा. भादुले यांचे मुलाचे लग्न दिनांक 07/06/2023 रोजी झाले आहे. त्या लग्न सोहळ्या मधे परिधान करण्यासाठी मी माझे सोन्याचे दागिणे सुमारे 25 तोळे हे कालिकादेवी पतसंस्था कराड येथुन लॉकर मधुन घरी आणले होते. ते दागिणे घरीच होते. माझी सासु कलावती यांचे दागिणी सुमारे 10 तोळे हे सुध्दा घरीच होते. माझे नेहमीचे वापरते दागिणे मणीमंगळसुत्र, नेकलेस, हातातील बांगड्या पाटल्या असे दागिणे सुमारे 6 तोळे घरातच होते. माझी आई शंकुतला हि कोल्हापुरवरुन येताना तिचे अंगावर सोन्याच्या 2 चैन, हातातील बांगड्या पाटल्या असे सुमारे 7 तोळे होते अशी माहिती शिंदे यांनी दिली.
काल दिनांक 09/07/2023 रोजी रात्रौ 09.00 वा. दरम्याण आम्ही नेहमी प्रमाणे जेवनखाण केले. नंतर बेडरुम मधे मी माझी आई शंकुतला मुलगी मधुरा मुलगा आद्वीक असे झोपी गेलो. नंणद उर्मिला ही तिंचे बेडरुम मधे झोपली होती. माझे पती डॉ. राजेश शिंदे हे बंगल्याचे पहिल्या बेडरुम मधे झोपले होते. रात्री सुमारे दोन वाजण्याचा सुमारास मी जागी झाले होते. त्यावेळी आमचे दवाखन्याचे गेट वर आमचा वॉचमॅन आहे काय? हे मी माझ्या मोबाईल मधे पाहिले असता वॉचमॅन झोपलेला होता. त्यानंतर मी ही झोपी गेले. परंतु माझी पुर्ण झोप लागली नव्हती.
साधारण रात्री 03.05 मि. डॉक्टर साहेब यांचे पहिल्या मजल्या वरील रुम मधुन मोठ्याने आरडाओरडा झाल्याचा आवाज ऐकु आला. म्हणुन मी उठुन घरातील लाईट चालु करुन लाईटचे उजेडात जिन्याकडे वरील मजल्यावर जाण्यासाठी निघाले त्यावेळी जिना चढत असता जिन्यामधे मला दोन अनोळखी इसमानी अडवुन म्हणाले वर जायच नाही, खाली चल. तरी मी त्याचे न ऐकता म्हणाले मला डॉक्टरांना बघु द्या. असे म्हणत मी वर जिना चढत गेले आणि पाहते तर डॉक्टरांना तीन ते चार लोकांनी घेरले होते. डॉक्टर त्याचे बेड वर गप्प बसले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या रुम मधील तीन ते चार लोक, डॉक्टर व जिन्यांमधे असलेले दोन लोक मी व डॉक्टर असे अनोळखी लोकांच्या धाकाने माझ्या बेडरुम पर्यंत आलो. माझी नंगद उर्मिला हिच्या बेड रुम मधे दोन अनोळखी इसम गेले होते. त्यांनी तिला धाक दाखवुन माझ्या बेडरुम मधे आणले. आम्हाला सर्वांना या अनोळखी सहा ते सात लोकांनी भिती दाखवुन त्यापैकी दोघांच्या हातात चाकु होते. त्या चाकुचा धाक दाखवुन गप्प बसा ओरडु नका असे म्हणाले. मी त्यांना म्हणाले माझी मुलगी अपंग आहे, माझे पती आजारी आहेत. त्यावेळी चोरटे म्हणाले आम्ही तुम्हाला काही करणार नाही. ऐवज घेवून जाणार आहे.
त्यानंतर माझ्या अंगावरील सोन्याचे दागिणे मंगळसुत्र, सोन्याची चैन तसेच आईच्या अंगावरील सोन्याचे दागिणे हातातील पाटल्या सोन्याची दोन चैन त्या चोरट्याने हिसकावुन घेतल्या. त्यानंतर त्या अनोळखी इसमानी माझ्याकडे कपाटाची चावी मागीतली. मी दिली नाही म्हणुन त्यांनी कपाट जोराचा हिसका मारुन कशाने तरी उघडले. कपाटातील रोकड व सोने असे मिळुन सुमारे 46 लाख 20 हजार रु. ऐवज चोरी करुन घेवुन गेले आहेत.
सोन्याचे दागिणे व रोकड चे वर्णन खालीलप्रमाणे
1)27.00.000/- त्यामधे 500/-,200/-,100/-,50/-,10/- दराच्या चलणी नोटा.
2)19.20.000/- त्यामधे 48 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे नेकलेस, मणीमंगळसुत्र, अंगठी, चैन, कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, ब्रेसलेट, लहान मणीमंगळसुत्र, कानातील झुबे,व इतर दागिणे
एकूण रक्कम – 46 लाख 20 हजार रुपये
या घटनेनमुळे बारा डाबरे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.