कराडात भर रस्त्यात महामंडळाची ‘एसटी’ पडली बंद; तासभर वाहतूक कोंडीने नागरिक झाले हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचा वापर किती वर्षे करायचा? याची मर्यादा निश्चित आहे. नवीन बस १५ वर्षे वापरता येते तर १५ वर्षांनंतर ती बस वापरातून बाजूला काढली जाते. कराड बसस्थानकात असलेल्या काही बसेस १२ वर्षांहून अधिक काळ झाल्याने त्या आरटीओकडून रिपासिंग करून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी बस प्रवासातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना आज कराड येथील पोपटभाई पेट्रोल पंप सिग्नल परिसरात घडली. एसटी बस (क्रमांक MH 40 N 8341) ही रस्त्यातच बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन कोल्हापूर नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलया. परिणामी परिवहन विभागाच्यावतीने तब्बल एक तासाने बस डेपोत नेण्यात आली.

कराड येथील कोल्हापूर नाक्यावरून पोपटभाई पेट्रोल पंपकडे येणाऱ्या मार्गावर सोमवार दुपारी एसटी बंद पडण्याची घटना घडली. साधारणता २ वाजण्याच्या सुमारास या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस अचानक बंद पडली. बंद पडलेल्या एसटीमुळे एसटीच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या वाहनांना पुढे जात आले नाही. परिणामी एसटीतील प्रवाशी खाली उतरले. तर एसटी वाहकाने याबाबतची माहिती आगार व्यवस्थापनास दिली. तब्बल १ तासानंतर ३ वाजण्याच्या सुमारास बंद पडलेली एसटी बस लोखंडी अँगल अडकवून दुसऱ्या एसटीच्या साहायाने ओढून आगारात नेण्यात आली.

जी एसटी बस बंद पडली होतो. त्या एसटी बसच्या फिटनेसबाबत सांगायचे झाल्यास एसटी बसचे आयुर्मान हे १४ वर्षे १० महिने असून ती वापरात आणण्यापूर्वी त्याची सर्वप्रथम ७ ऑगस्ट २००९ रोजी नोंदणी करण्यात आली आहे. या एसटी बसचे आयुर्मान हे २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे.

अशा प्रकारे सातारा तालुक्यात अनेक मार्गावर एसटी बस बंद पडण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. सहा महिन्यांत जिल्ह्यातील विविध मार्गावर विविध आगाराच्या सुमारे ५५० एसटी बस बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याकडे एसटी महामंडळाचे मात्र दुर्लक्षच झाल्याने प्रवाशांना तिकीट काढूनही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बंद पडणाऱ्या एसटी बसेसकडे आगारव्यवस्थापने लक्ष द्यावे : प्रमोद पाटील

लाखों रुपये खर्च करून कराड येथे आकर्षक असे बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून असंख्य एसटी बसेस ये-जा करत असतात. मात्र, एसटी बसस्थानकात असलेल्या एसटी बसेस या अधून मधून बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी बसेस पूर्णपणे दुरुस्ती करून, ती चालविण्यास योग्य आहे का? ही तपासून पाहणे आवश्यक आहे. तसेच एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर बंद पडणार नाहीत, याकडे आगार व्यवस्थापनाने लक्ष देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

जिल्ह्यातील एसटी बसची स्थिती

1) एकूण बसची संख्या – ६८०

2) नवीन आलेल्या बस – २०

3) दररोजची प्रवासी संख्या : सुमारे १ लाख ७५ हजार

4) सहा महिन्यांत बंद पडलेल्या सुमारे – ५५०