वाठारमध्ये भराव पुलावरून कंटेनर उपमार्गावर कोसळला तर वहागावला बस खड्ड्यात

0
382
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू महामार्गावर बारा तासांत दोन अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये कराड तालुक्यातील वाठार येथे चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर भराव पुलावरून उपमार्गावर कोसळला तर वहागावजवळ बस सहापदरीकरणासाठी खोदलेल्या खड्यात गेली. या दोन्ही अपघातामध्ये चालकांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबात अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळुरू महामार्गावर ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे वारंवार अपघात होत असून मंगळवारी कराड तालुक्यातील वहागाव येथे महामार्गाच्या कामासाठी काढलेल्या खड्ड्यात एसटी बस कोसळताना थोडक्यात वाचली आहे. या अपघातात पुणे -कोल्हापूर- आजरा या बसचा अपघात झाला असून, एसटी बसची दोन चाके महामार्गावरून खाली गेली आहेत. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.

गेल्याच आठवड्यात या ठिकाणी पार्सल सेवा घेऊन जाणारा ट्रक महामार्गावरून थेट खड्ड्यात कोसळला होता, तर बुधवारी सकाळी वाठार येथे कंटेनर भरावपुलावरून उपमार्गावर कोसळला आहे. या दोन्ही अपघातांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, चालकांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.