कराड उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 356 मतदान केंद्रांची उभारणी – निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 55 हजार 359 पुरुष, 1 लाख 50 हजार 837 स्त्री व इतर 7 मतदार असे एकूण 3 लाख 6 हजार 203 मतदार आहेत. त्यापैकी 2 हजार 235 सैनिक मतदार असून सर्व मतदारांची मतदान ओळखपत्रे फोटो सहीत उपलब्ध झाली आहेत. एकूण 356 मतदान केंद्रे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात असून 18 केंद्रे शहरी भागात तर उर्वरित 338 केंद्रे ग्रामीण भागातील असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे यांनी कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाच्या कामकाजाबाबत नुकतीच पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, डॉ. जस्मिन शेख व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकार चव्हाण म्हणाले कि, संवेदनशील व असुरक्षित एकही मतदान केंद्र मतदारसंघात नाही, जास्तीत जास्त 1337 मतदार संख्या तर कमीत कमी 170 मतदार संख्या असणारी केंद्रे मतदारसंघात आहेत. कराड, खटाव, कोरेगाव व सातारा तालुक्यात मतदारसंघ विस्तारलेला आहे निवडणूक प्रशासनासाठी एकूण 44 झोन तयार केलेले आहेत

ज्या 85 वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरून दिलेला आहे. त्यांचे गृह मतदान नियोजित वेळापत्रकानुसार घेतले जाणार आहे,निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी सुविधा मतदान केंद्रे सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत. 50% मतदान केंद्रांचे मतदानाच्या दिवशी वेब कास्टिंग केले जाणार आहे,मतदान केंद्रावर उपयोगात आणल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांवर उमेदवार किंवा उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी मतदान घेतले आहे.

वाहतूक व्यवस्था, महिला मतदान कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सुविधा, मतदान साहित्य वितरण व्यवस्था, मतदान साहित्य जमा करताना केलेले नियोजन, मतदान कर्मचाऱ्यांसाठी केलेले वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, मतमोजणी व्यवस्थेचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून केलेले नियोजन, महिला मतदान केंद्र(पिंक बूथ,) युवा मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र, पर्दानशीन मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे नियोजन,इत्यादींची सविस्तर माहिती निवडून निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.