साताऱ्यात फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | अलीकडे फसवणूक करण्याच्या घटना चांगल्याच वाढलेल्या आहेत. दरम्यान, इमारत बांधून त्यामध्ये दोन फ्लॅट देतो, असे सांगून सुमारे 3० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमर सतीश देशमुख (रा. सदरबझार, सातारा) असे व्यावसायिकाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला उद्या दि. ३ सप्टेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज भागवत मिसाळ (वय 39, रा.अहिरे कॉलनी, संभाजीनगर, सातारा) यांची अमर देशमुख याच्याशी व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती. अमर देशमुख याने गुरुवार पेठेत इमारत बांधकाम परवानगी घेऊन काम सुरू केले होते. मात्र, २०२१ रोजी त्याला काही व्यावसायिकांची थकबाकी देणी झाली होती. ती देणी देण्यासाठी वप्र कल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अमर देशमुख याने पंकज मिसाळ यांना भेट्रन एका प्रकल्पातील पहिल्या मजल्यामधील दोन फ्लैंट विकत घेण्याची विनंती केली.

त्यानुसार ४० लाख रुपये रकमेचा व्यवहार दोघांमध्ये ठरला. फ्लॅट घेण्यासाठी लागणारी व्यवहाराची रक्कम अमर देशमुख याने तक्रारदार मिसाळ यांना संबंधित रक्कम इमारत बांधण्यासाठी ज्या व्यावसायिकांकडून साहित्य घेतले होते, त्या व्यवसायिकांना पाठवण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी व्यावसायिकांना पैसे पाठवले. मात्र, दोन्ही फ्लॉंटचे खरेदीपत्र करुन देण्याचे बंधनकारक असताना तसेच आजतागायत प्रत्यक्ष जागेवर आर.सी.सी. कॉलम उभे करण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम त्या ठिकाणी झाले नसल्याचे तक्रारदार पंकज मिसाळ यांनी आपत्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत.