भाजपकडून साताऱ्यातील मतदारसंघनिहाय आढावा; ‘या’ महत्वाच्या चार मतदारसंघांवर लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात निकटीचा अविधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे. तसेच आचारसंहिता देखील लागू झाली असून हि आचार संहिता लागू होताच विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याकरिता भाजपची जिल्हा कार्यकारणी सक्रिय झाली आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार बूथप्रमुख, शक्तीप्रमुख व मंडलप्रमुख यांनी आपापल्या रचना बळकट करून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यावतीने देण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. त्या अनुषंगाने भाजपने तात्काळ विधानसभानिहाय बैठका घ्यायला सुरुवात केली असून सातारा जिल्ह्यातीळ मतदार संघाबाबत माहिती घेण्यासाठी भाजपकडून नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदार संघाबाबत भाजपचे 3000 बुथ व केंद्रप्रमुख यांच्या करण्यात आलेल्या नेमणुका याबाबत महाराष्ट्राचे प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा घेण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकांमध्ये पक्षाच्या स्थानिक पातळीवर संघटनेचा शक्ती, केंद्र, बूथ प्रमुख रचनेचा आढावा घेण्याचे काम पुढील काही दिवसांत केले जाणार आहे. उमेदवार घोषित होण्याची वाट न पाहता तातडीने प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी व मतदारांशी संवाद इत्यादी कार्यक्रम सूचित करण्यात आले आहेत. सरकारी योजनांचा प्रसार, प्रचार आणि संवाद अशा सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने भाजपची 120 उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार हे सुद्धा औत्सुक्याचा विषय आहे. याशिवाय महायुतीने मुंबईत तातडीची बैठक घेऊन भाजपच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांना तेथे निमंत्रित केले होते. संवाद यात्रा, परिवर्तन यात्रा याशिवाय मतदारांच्या गाठीभेटी आणि विधानसभा मतदारसंघनिहाय रोजच्या हालचालींची अपडेट ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

चार मतदारसंघांवर लक्ष केंद्रित

कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा व माण या चार विधानसभा मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. यंदा पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती न घेता थेट वरिष्ठ पातळीवर एजन्सी नेमून विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षनिरीक्षक पाठवले होते.