कराड प्रतिनिधी । सध्या सर्वत्र पावसाळ्याच्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, नाले, विहिरी, ओढे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दुर्घटना घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या खटाव व माण तालुक्यात पाऊस नसल्याने शेतीची पेरणी रखडलेली आहे. हि दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावी अशी मागणी करत आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय सदस्य रणजीतसिंह देशमुख ,डॉ. महेश गुरव, शेतकरी संघटनेचे नेते अनिल पवार, ज्येष्ठ नेते सत्यवान कांबळे, परेश जाधव, राजू मुलाणी, सत्यवान कमाने , दत्ता केंगारे,राहुल सजगणे, निलेश घार्गे, बाबासाहेब माने, शिवाजीराव यादव, हणमंत भोसले आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उप अधीक्षक अजय कोकाटे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कातरखटावमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला 1 तास ‘रास्ता रोको’; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या pic.twitter.com/wZFNKREgaX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 22, 2023
दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन कातर खटाव मंडलाधिकारी बाबर यांना देण्यात आले. खटाव माण तालुका दुष्काळ जाहीर करावा, यास उरमोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी त्वरीत सोडावे, खटाव तालुकाच्या पूर्व भागासाठी तारळी योजनेचे पाणी उपलब्ध करून दयावे, खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, पिक कर्ज संपूर्णपणे माफ करावे, नियमित कर्ज फेडणा-या शेतक याना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत मिळावे, उचाईग्रस्त गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी ट्रॅकर बालू करावेत, जनावरासाठी चारा पाण्याची सोय करावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.