पृथ्वीराजबाबांच्या धमकी प्रकरणाची कायदेशीर चौकशी करा : कराडच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारी मध्यरात्री नांदेडच्या इसमाकडून ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली. या प्रकरणी संबंधित इसमास अटक करण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर कराड आणि मलकापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांची भेट घेतली. संबंधित प्रकरणाची कायदेशीर चौकशी करावी तसेच धमकी देणाऱ्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पधाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी कराड येथील काँग्रेस पदाधिकारी प्रा. धनाजी काटकर, कराड उत्तरचे अध्यक्ष निवास थोरात, अशोकराव पाटील, शिवाजीराव मोहिते, अविनाश नलवडे, ऋतुराज मोरे, शिवाजी जाधव, अमित जाधव, मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम येडगे आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते.

कराड येथील दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल मनोहर भिडे यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच भिडेंवर कारवाई करावी, अशी मागणीही केली होती. याबाबत सभागृहामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिलेले आहे.

दरम्यान, आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात केलेल्या मागणीनंतर समाजातील काही अपप्रवृत्तींनी त्यांना धमकीचा ई-मेल पाठवला. या संदर्भात कराड शहर पोलिस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेलद्वारे दिलेली धमकी विचारात घेता, आपल्या विभागाकडून याचा गांर्भीयपुर्वक विचार करुन कायदेशीर उपाययोजना करणे आवश्यक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे.

मराठी माणसाचा बाणा दाखवत त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची विधानसभा सभागृहात मागणी केली आहे. चव्हाण हे पुरोगामी विचारसरणीचे पाईक आहेत. सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्य लढ्याची मोठी परंपरा लाभली आहे. सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये देशामध्ये तीन जिल्ह्यामध्ये प्रतीसरकार स्थापन झाले होते त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आजही जपला जात आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे स्वातंत्र्य लढ्याचे महानायक असून फुले दापत्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग काम केले असून, श्री साईबाबा हे सर्व साई भक्तांचे श्रध्दास्थान आहे. तसेच स्वातंत्र्य सेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे कृषी क्रांतीचे जनक आहेत. या सर्व महान व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह विधाने करुन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हि बाब अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. सध्या स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना जाणीवपुर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. अशात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेलद्वारे धमकी देणाऱ्या इसमाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनामुळे त्यांनी योग्य ती कारवाई करवाई, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.