काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

0
26
Indrajit Gujjar joins Uddhav Thackeray group
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्या गटाचे कराडचे काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक गुजर यांना शिवबंधन बांधले.

यावेळी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी आमदार दगडूदादा सकपाळ, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्यासह उध्दव ठाकरे गटातील कराड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यासह राकेश पवार, राजकुमार (भाऊ) पाटील यांनी व गुजर समर्थकांनी शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. दरम्यान, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कराडला इंद्रजित गुजर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. आपण लवकर कराडात येणार आहोत.