मुद्रांक शल्क करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शासनाने मुद्रांकशुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ दोन टप्यात जाहीर केली.पहिला टप्पा हा सन 2001 ते 2020 मधील नोंदणीकृत व अनोंदणीकृत निष्पादित झालेल्या व कमी मुद्रांक शुल्क दिलेल्या प्रकारांनासाठीचा कालावधी दि 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवार 2024 पर्यंत होता. तथापि सदर कालावधीची मुदत शासनाने दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढविण्यात आल्या असून पहिल्या टप्यात कमी भरलेल्या मुदांक शुल्काकरिता 25 टक्के व दंडा करिता 90 टक्के सवलत आहे. दुसरा टप्पा हा सन 2001 ते 2020 मधील नोंदणीकृत व अनोंदणीकृत निष्पादित झालेल्या व कमी मुद्रांक शुल्क दिलेल्या प्रकरणांसाठी कालावधी दि. 1 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत आहे. यामध्ये कमी भरलेल्या मुदांक शुल्काकरिता 20 टक्के व दंडा करिता 80 टक्के सवलत आहे.

सातारा जिल्हातील सन 1980 ते 2000 या कालावधीतील 1634 प्रकरणांमध्ये वसुली रुपये 1 लाखाच्या आतील असल्याने अभय योजना 2023 नुसार त्यामधील मुद्रांक शुल्क रुपये 4 कोटी 66 लाख 36 हजार 681 रुपये इतकी रक्कम माफ करण्यात आलेली आहे. सदर कालावधीतील वरील अक्षेपित प्रकरणांमध्ये 7/12 पत्रकी बोजा नोंद असल्यास मूळ दस्तावर प्रमाणित करून बोजा कमी करून घेण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.

सन 2001 ते 2020 मधील 189 प्रकरणामध्ये 47 लाखांची वसुली झालेली आहे. थकीत मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पक्षकारांच्या संबंधित नोंदणीकृत दस्तातील मिळकतीवर बोजा नोंद करण्यात येणार आहे महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील कलम 46 व 59 प्रमाणे मालमत्ता जप्त करणे, बँक खाती गोठवीणे तथा पोलिस कार्यवाही करण्यात येणार आहे.