आता ST बसच्या तक्रारींचा तोडगा ‘ऑन द स्पॉट’ निघणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्रात लालपरीचा चाहता व प्रवाशी वर्ग खूप आहे. कारण सुरक्षितपणे प्रवास करायचा असेल तर एसटी सारखे दुसरे वाहन नाही. मात्र, कधीकाळी एसटी वेळेवर मिळत नाही, एसटीच्या फेरी अचानक रद्द केली जाते, रस्त्यातच एसटी बस बंद पडते, एसटीच्या फेऱ्या वेळेत सोडल्या जात नाहीत अशा अनेक तक्रारी उध्दभवतात. यावेळी तक्रार नेमकी करायची कोणाकडे? असा प्रश्न निर्माण होतो. यावर तोडगा काढण्यासाठी आता एसटी महामंडळ प्रशासनाने एसटीच्या आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे, मोबाईल नंबरच बस स्थानकात लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीचा तोडगा जागेवरच निघणार आहे. लवकरच कराड बसस्थानकातही असे फलक लागणार आहेत.

राज्य परिवहन विभागाच्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या बससेवेत अनेक गैरसोयी निर्माण होत आहेत. एसटी महामंडळाकडे असलेल्या अनेक वर्षांपूर्वीपासूनचा एसटी बसचे रिपासिंग करून त्या वापरलया जात आहेत. त्यामुळे एसटी बसची वारंवार बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती केली जातेय. काही बस या प्रवाशांच्या मागणीनुसार लांब पल्यासाठी पाठविल्यामुळे एसटीच्या दररोजच्या गावी होणाऱ्या फेऱ्या या रद्द कराव्या लागतात. त्यामुळे एसटी बसची कमतरता भासल्याने प्रवाशांची गैरसोय होते. यासह अन्य समस्यांना एसटीच्या प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

सातारा जिल्ह्यात एसटी महामंडळास चांगले उत्पन्न आहे. तसेच एसटी महामंडळाचे राज्यात ५८० पेक्षा जास्त बस स्थानके आहेत. त्या स्थानकातून हजारो एसटी बसेस ग्रामीण भागात ये-जा करतात. त्यापैकी अनेक बस स्थानकांवरील चौकशी खिडकीतील दूरध्वनी सेवा बंद असल्यामुळे अडचणीदरम्यान ऐन वेळी कोणाशी संपर्क साधायचा? असा प्रश्न प्रवाशांसमोर अनेकवेळा पडतो. अशावेळी आता थेट बसस्थानकावरच अधिकाऱ्यांचे फोन नंबर लावले जाणार असल्यामुळे त्याचा प्रवाशाच्या तक्रारीचा निपटारा लगेच होणार आहे.