सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघामधील सर्व नागरिकांना मतदान करता यावे यासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हाधिकारी डूडी यांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार, दि. 7 मे रोजी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली असून 45 – सातारा लोकसभा मतदार क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे.
शासनाकडील अधिसूचना शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील. या सार्वजनिक सुट्टीचा लाभ घेऊन नागरिक व महिलांनी येत्या 7 मे 2024 रोजी मतदान करावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.