ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे : जितेंद्र डूडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा पूर्वतयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट याबाबतची संपूर्ण माहिती करून घेण्याचे व पूर्व तयारीचा भाग म्हणून स्वतः प्रात्यक्षिक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी म्हणाले की, सातारा जिल्ह्यांतर्गत आठही मतदार संघांना एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के इतक्या ईव्हीएम – व्हीव्हीपॅट मशिन्स वाटप करणेत आलेल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचने प्रमाणे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृतीबाबत मतदारसंघ निहाय प्रत्येक तहसिल कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय येथे ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत.

त्याबरोबर मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचे गाव निहाय प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी राबविण्यात येत आहे.