मान्सून पूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आक्रमक; होर्डिंग्जबाबत दिल्या महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सून पूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी हवामान विभागाने सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंत्रणांनी सतर्क राहून व कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी बोलत होते. बीजे होर्डिंग्ज नादुरुस्त आहेत. कमकुवत आहेत, खराब आहेत ते तात्काळ काढून टाकावेत, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज ज्यांच्या मालकीची आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.

येत्या 5 जूनपर्यंत होर्डिंग्जच्या स्टक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करावे. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्जबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करावा. मान्सून कालावधीत मनुष्य व पशुहानी होणार नाही याची सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. सर्व गटारे स्वच्छ करावीत. नेहमी पूर येणाऱ्या भागात अधिकची काळजी घ्यावी. स्वच्छता मोहिम राबविताना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.