कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक मलकापूर हद्दीत कराड खरेदी विक्री संघ इमारतीशेजारी भारती बँक परिसरात सर्व्हिस रस्त्यावर एका सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरु झाल्याची घटना आज गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडून गेला. दरम्यान, ज्या ठिकाणी सीएनजी गॅस गळतीचा टँकर उभा होता. त्या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली आहे. तर परिसरातील इमारतीमधील लोक देखील इमारतीतून बाहेर यावे लागले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, कोल्हापूरहून सातारच्या दिशेने एक सीएनजी गॅसच्या टाक्या घेऊन ट्रक निघाला होता. ट्रककराडजीक मलकापूर हद्दीतील खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप हद्दीत इमारतीशेजारी भारती बँक परिसरात आला. महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने या ठिकाणी दोन्ही लेनवरील वाहतूक हि सर्व्हिस रोडवरून सुरु ठेवण्यात आली आहे. या सर्व्हिस रोडवरून सातारच्या दिशेने सीएनजी गॅसच्या टाक्यांनी भरलेला ट्रक निघाला असताना अचानक ट्रकमधील टाक्यातून सीएनजी गॅस बाहेर येऊ लागला. गॅस बाहेर येत असल्याचे ट्रकमधील ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने त्याने तो ट्रक खरेदी विक्रि संघाच्या इमारतीसमोर सर्व्हिस रस्त्यावर उभा केला.
पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधील CNG गॅसच्या टाकीला गळती pic.twitter.com/EsFyy62a0P
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 23, 2024
ट्रक मधील सीएनजी गॅस बाहेर येत असल्याचे परिसरात इमारतीमधील राहत असलेल्या रहिवाशांनी पाहिले. त्यांनी तत्काळ इमारत इमारतीतून खाली धाव घेतली. तसेच इतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली. घटनास्थळी ड्रॉयव्हरने प्रसंगावधान राखत लिकेज झालेल्या सीएनजी टाक्याचे लिकेज काढून बाहेर पडणारा सीएनजी गॅस बंद केला. साधारण एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सीएनजी गॅसवर नियंत्रण मिळवण्यात ड्रायव्हरला यश आले. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
एक तासांचा थरार अन् नागरिकाचा जीव टांगणीला
गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नजीक भारती बँक परिसरात सर्व्हिस रस्त्यावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सीएनजी टाक्यातील गॅस गळती झाल्याची घटना घडली. यावेळीच परिसरात असलेल्या रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडून गेला. त्यांनी इमारतीतून बाहेर धाव घेतली. तर सर्व्हिस रोडवरील सातारच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कँडी देखील निर्माण झाली. हि सीएनजी गॅस गळतीची थरारक घटना एक तपासात घडली. या घटनेमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता.