मराठा समाजाने संयम बाळगावा तर विरोधकांनी आरक्षण टिकण्यावर सकारात्मक चर्चा करावी : CM एकनाथ शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । “आम्ही मराठा समाजबांधवांच्या आरक्षणाबाबत नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला. मात्र, मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही, असे काहीजण सांगत आहेत. परंतु, का टिकणार नाही?, याची कारणे मात्र त्यांच्याकडून दिली जात नाहीत. वास्तविक, आरक्षण कसं टिकेल यावर विरोधाकानी आमच्यासोबरोबर सकारात्मक चर्चा केली पाहिजे. हातात संधी होती, त्यावेळी त्यांनी संधीचे सोने केले नाही,” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना
लगावला.

सातारा येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण मागत आहे. या समाजाला आरक्षण देण्यासाठी ४ लाख कर्मचाऱ्यांची टीम आम्ही लावली. दिवसरात्र काम केले. सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली, ज्या त्रुटी सांगितल्या त्या पुर्ण दूर केल्या.

अभ्यासपूर्ण सर्व्हेक्षणातून मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागसलेपण सिद्ध केले. यासाठी तज्ज्ञ लोकांनी मेहनत घेतली. मराठा समाजाच्या लढ्यास यश मिळाले आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या टिकेल, असाच निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या सरकारने मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम केले आहे. यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने तेलंगणा हैद्राबादपर्यंत काम करत आहे. समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उर्वरित लोकांसाठी दहा टक्के आरक्षण दिले आहे. यामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांत मराठा समाजाला न्याय मिळेल. सरकार पूर्णपणे सकारात्मक असून मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.