मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कालेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या कला शिक्षकाचा सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | ठाणे येथे नुकताच प्रताप सरनाईक फाउंडेशन मार्फत विहंग संस्कृती फेस्टिवल पार पडले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराड तालुक्यातील काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे कलाशिक्षक किरण गंगाराम कुंभार यांना शिवगौरव पुरस्कार – २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रीराम मंदिर अयोध्या उद्घाटन सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने ‘प्रत्यक्ष चित्राविष्कार’ या कार्यक्रमासाठी रामानंद मिशन ट्रस्ट अयोध्या व वाची आर्ट गॅलरी मुंबई यांच्या मार्फत देशातील २० चित्रकारांची उल्लेखनीय निवड करण्यात आली आहे. त्या २० चित्रकारांच्या मध्ये कराड तालुक्यातील काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे कलाशिक्षक किरण गंगाराम कुंभार यांचा समावेश करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेच्या काले गावातील महात्मा गांधी विद्यालयाला श्री. किरण गंगाराम कुंभार (सर) हे विद्यार्थ्यांना कलेचे धडे देतात. त्यांची चित्रकला प्रसिद्ध तर होतीच, पण आता थेट राम जन्मभूमी अयोध्येत सुद्धा त्यांनी रेखाटलेली चित्रे संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहेत. हा एका अर्थाने सातारा जिल्ह्यासाठी आणि रयत शिक्षण संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. देशातील २० चित्रकारांमध्ये किरण गंगाराम कुंभार सरांचा नंबर लागल्याने पंचक्रोशीतील सर्व जनतेकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे. त्यांच्या या यशाने साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.