सातारा प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी कारावास भोगला रक्त चालले हजारो स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले. अशा हौतात्म्य पत्करलेल्या सातारा येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून शहरवासियांनी शपथ घेत ऑगस्ट क्रांतिदिन साजरा केला.
ऑगस्ट क्रांती दिनाला अर्थात दि. 9 ऑगस्ट 1942 ला आज 81 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचे औचित्य साधत आज सकाळी सातारा येथील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीयता जागर अभिया यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास प्रा. मंगला साठे, रजनी पवार, हेमा सोनी, माधवी वर्पे यांनी पुष्पहार अर्पण केला आणि हुतात्मा स्तंभाला प्रा. डॉ. भास्करराव कदम, गणेश कारंडे व इतरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी “ऑगस्ट क्रांती जिंदाबाद, महात्मा गांधी अमर रहे , इन्किलाब जिंदाबाद,” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी प्रा. मंगला साठे यांनी उपस्थितांना सामूहिक प्रतिज्ञा दिली. शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी प्रतिज्ञेच्या अगोदर क्रांतीवर आधारित पोवाडा सादर केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास रजनी पवार, प्रा. मंगला साठे, मानसी वर्पे, हेमासोनी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हुतात्मा स्तंभाला प्रा. डॉ. भास्करराव कदम व गणेश कारंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांनीच पुष्पांजली वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी केले. यावेळी बाबुराव शिंदे, नजीम इनामदार, मीनाज सय्यद, जयंत उथळे, प्रकाश खटावकर, माणिक अवघडे, दत्ता राऊत, विजय पवार, डॉ. दीपक माने, जयप्रकाश जाधव, प्रा. संजीव बोंडे, प्रमोद परामणे, प्रा. डॉ. विजय माने, भारत लोकरे, राजन कुंभार, मनोज चाकणकर, महेश गुरव आदी उपस्थित होते.