मणिपूर घटनेवरून चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाल्या की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | मणिपूर या ठिकाणी घडलेली घटना हि दुर्दैवी आहे. या ठिकाणी घडलेल्या घटने प्रकरणी केंद्र सरकार बोलायला तयार आहे. चर्चेसाठी विरोधकांनाही निमंत्रण देण्यात आले. मात्र, निमंत्रण देऊनही विरोधी पक्षच चर्चेला येत नाही. यामध्ये विरोधकांकडून कुठेतरी राजकारण आणले जात असल्याची अशी दाट शक्यता आहे, अशी टीका करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

तळमावले, ता. पाटण येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मणिपूरच्या घटनेवरून ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांनी मी फक्त राहुल गांधींबद्दल जे काय म्हंटले.तेवढेच ऐकले आहे. वास्तविक पाहता मणिपूर बया ठिकाणी घडलेली घटना अतिशय वाईट आहे. देशात, राज्यात महिलांबाबत कुठेही घडणाऱ्या अशा घटनांचे समर्थन केलेच जाऊ शकत नाही. मणिपूर या ठिकाणी ज्या पद्धतीने घटना घडली. ज्या महिला, भगिनीच्या बाबतीत घडली. ती सुद्धा आपल्याच देशातील भगिनी होती. त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमधील मालदामध्ये घटना घडली.

राजस्थानमध्ये देखील घटना घडत आहेत. मात्र, विरोधी पक्ष काही बोलायला तयार नाही. विरोधकांकडून कुठेतरी राजकारण आणले जात आहे. विरोधी पक्षाला निमंत्रण देऊन देखील चर्चेला येत नाहीत. राहुल गांधी यांची ही काय पहिली वेळ नाही, या आधीही त्यांनी लोकशाहीच्या मंदिरात चुकीचे वर्तन केले आहे. आमचं सरकार आले म्हणून अत्याचार वाढलेत, असे म्हणायचं का? अत्याचार हे चालूच आहेत. परंतु त्या वेळचे आणि आताच सरकार त्यावर काय भूमिका घेतेय हे महत्त्वाचे असल्याचे वाघ यांनी यावेळी म्हंटले.