महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरण व कृती आराखडा तयार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आलेली आहे. या गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या https://womenchild.maharashtra.gov.in https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असून या संदर्भाने हरकती व सूचना सादर करण्यात, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेले असुन त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. या बाल धोरण व कृती आराखड्यामध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरिकांनी सादर कराव्यात.

प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ च्या संदर्भाने नागरीकांच्या हरकती व सूचना दि. 30 जून २९२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, २०, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे ०१ या पत्त्यावर अथवा [email protected] या ईमेल वर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.