पहिलीच्या पुस्तकात ‘चाइल्ड लाइन’चा नंबर; विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर महत्त्वाचे पाऊल

0
169
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत बालकांच्या संरक्षणासाठी आता शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावरचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पहिलीच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांत १०९८ हा चाइल्ड हेल्पलाइन नंबर समाविष्ट करण्यात आला असून, संकट समयी मुलांना मदतीचा सुरक्षित पर्याय मिळावा, हा त्यामागचा हेतू आहे.

‘गुड टच बॅड टच’ या संकल्पनेविषयी मुलांमध्ये जागृती करणे, तसेच बाललैंगिक शोषण सारख्या गुंतागुंतीच्या विषयाला संवेदनशीलपणे वळण देण्याचा शिक्षण विभागाचा हा सकारात्मक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतः च्या सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण होईल, तसेच संकटात असताना मदत मागण्याचे धाडस ही होईल. १०९८ वर कॉल केल्यास प्रशिक्षित तज्ज्ञांमार्फत तत्काळ मदत केली जाणार आहे. पाठ्यपुस्तकात अशाप्रकारे प्रशासकीय स्तरावरून मदत होणार आहे.

तत्काळ मदत, बालहक्कांचे संरक्षण

विद्यार्थ्यांच्या पहिलीच्या पुस्तकात देण्यात आलेल्या १०९८ नंबरवरून तत्काळ कृती होते. बाल शोषण, पळवून नेणे, बालविवाह यासारख्या गंभीर बाबींवर योग्य तो कायदेशीर हस्तक्षेप केला जातो.

चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्यास काय होते?

चाइल्ड हेल्पलाइनच्या देण्यात आलेल्या १०९८ वर कॉल केल्यास प्रशिक्षित अधिकारी फोन उचलतात. बालकाची माहिती गोपनीय ठेवली जाते. गरज असल्यास तत्काळ मदत पोहोचवली जाते. मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर मदतही मिळू शकते.

शाळेत वाहतूक नियमांचे धडेही मिळणार

पहिलीच्या पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर इतर गोष्टींविषयीचे ज्ञान दिले जात आहे. यामध्ये वाहतूक चिन्हे, झेब्रा क्रॉसिंग, हेल्मेटचा वापर आदी बाबी शिकविण्यावर भर देण्यात आला आहे.

मुलांत सुरक्षिततेची भावना, आत्मविश्वास वाढेल

विद्यार्थी जेव्हा एकटा असेल आणि त्याच्यवर जेव्हा एखादे शकत येईल तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्याचा पर्याय दिल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, त्यांच्यात आपण सुरक्षित आहोत, ही भावना निर्माण होईल.

चाइल्ड हेल्पलाइनचा नंबर यासाठी गरजेचा

मुले अनेक वेळा अडचणीत सापडतात. पण त्यांना कुठे मदत मागावी हे कळत नाही. १०९८ हा टोल फ्री नंबर त्यांच्यासाठी विश्वासार्ह पर्याय ठरणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरणार आहे. तसा शासन निर्णय राज्यशासनाने जारी केला.