मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या हस्ते जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन

0
1

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील मुला-मुलींच्या निरीक्षण गृह/बालगृहात जिल्हास्तरीय चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते झाले. यावेळी
मुला-मुलींच्या शारिरीक, मानसिक विकासाबरोबर परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत. अशा स्पर्धांमुळे त्यांच्यात सांघीक भवना वाढीस मदत होते, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.

कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आनंदा खंडागळे, मुला मुलींच्या निरीक्षण गृह/ बालगृहाचे सचिव प्रदिप सांबळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर, पत्रकार शरद काटकर, संरक्षण अधिकारी अजय सपकाळ, बाल न्याय मंडळाच्या सदस्या स्मिता जामदार, आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, निरीक्षण/बाल गृहातील 18 वर्ष पूर्ण विविध क्षेत्रात काम करणार आहेत. आपल्या निरीक्षण गृहातील मुले मुली आपले भाऊ बहिणी आहेत. त्यांच्या भविष्यासाठी सहकार्य करावे. बालगृहातील अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररस्त मुला मुलींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरु बाल महोत्सव मोलाची भूमिका बजावेल. क्रीडा स्पर्धांमध्ये विजय-पराजय होत असतो. निराश न होता निरीक्षण गृहातील मुला मुलींनी आपले संबंध चागले ठेवावेत.

यावेळी निरीक्षण गृह/ बालगृहाचे सचिव श्री. साबळे म्हणाले, चाचा नेहरु बाल महोत्सव हा चांगला उपक्रम आहे. यामुळे निरीक्षण व बाल गृहातील मुले एका वेगळ्या वातावरनाचा आनंद घेतात. तर क्रीडा स्पर्धेत मुला मुलींनी कौशल्य पणाला लावून सहभाग घ्यावा, असे आवाहन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती काटकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय सपकाळ यांनी मानले.